तरुणाईला वेड ऑनलाईन जुगाराचं; निद्रानाशाचा आजारांने अनेकांना ग्रासलं

आज कालचा काळ हा ऑनलाइनचा काळ म्हणून ओळखला जात आहे. प्रत्येक गोष्ट सध्या ऑनलाइन झाली आहे.यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
online gambling news
online gambling news saam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : आज कालचा काळ हा ऑनलाइनचा काळ म्हणून ओळखला जात आहे. प्रत्येक गोष्ट सध्या ऑनलाइन झाली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेमच्या माध्यमातून काही तासातच लाखो रुपये कमवा करोडपती व्हा अशी अशी आमिषे दाखविणाऱ्या जाहिरात देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. या जाहिरात तुमच्या मार्फत कळत नकळत तुमचे पैसे हे उकळले जातात. शहरी असो की ग्रामीण तरुणाई या ऑनलाईन गेमकडे (Online Game) मोठया प्रमाणात ओढली गेली आहे. तर या गेममुळे अनेक लोकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे प्रकरणे समोर आली आहे. (Online Gamble News In Marathi)

online gambling news
क्रूरतेचा कळस! बायकोच्या संशयित प्रियकराचं अपहरण, गुप्तांगावर मारला स्प्रे, त्यानंतर...

गेम खेळून अनेक तास त्यात अकडलेले तरुण (Youth) असतात.या सर्वच गोष्टींचा अनेकांच्या दैनंदिन कामकाजावरही विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.तर बरेचजण यात कर्जबाजारी तर काहीजण नैराश्यात देखील गेलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळं या गेम अन् यांच्या धोक्यापासून वाचायचं असेल तर पालकांनी सतर्क राहणं गरजेच आहे.आपली मुलं मोबाईल मध्ये काय खेळतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अनकेजण कर्जबाजारी होतात,व्यसनाधीन होतात,निद्रानाश होऊन आजार वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे हे थांबावायचं असेल तर मोबाईल प्ले स्टोरमधून गेम घेताना विचार केला पाहिजे.

पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने सांगतात की, 'अशा गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे. त्यातच आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे.तरुणाई तर मोबाईल हाताळण्यात एक्सपर्ट आहेत. दिवस रात्र मोबाईच्या सानिध्यात घालवणाऱ्याना आता ऑनलाइनच्या गेमच्या माध्यमातून गुंतण्याच्या तरुणाईचे प्रमाण अधिकच वाढलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळं सायबर गुन्ह्यातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अशा ऑनलाइन गेमच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी करताना पाहायला मिळतात'

पुढे नेमाने म्हणाले,'सुरुवातीला यात काही बोनस म्हणून आपल्याला पैसे देखील मिळतात. पण पुढे मात्र आपल्याला याचं व्यसन लागतं आणि पुन्हा आपलं अकाऊंट रिकामच होत जातं.या गेम मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींची आर्थिक फसवणूक देखील झाली आहे.त्यामुळे सायबर पोलीस देखील अशा गेम खेळताना सावधान राहण्याच आव्हान करण्यात येतं'

online gambling news
Salman Khan : अन् 'दबंग' सलमान खान मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातून पडला बाहेर (व्हिडिओ पाहा)

रात्र रात्र भर जागून मोबाईल गेम खेळणे तसेच पैसे हरल्यामुळे झोप उडून काही तरुणांना तर निद्रा नाशही जडला आहे.याच नैराश्यातून दारूच्या आहारी जाण्याच प्रमाण वारंवार वाढला आहे.एकंदरच हे ऑनलाइन पैसे कामविणारे गेम तरुणाईसाठी मारक ठरत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com