Chandrakant Patil News : मोठी बातमी ! चंद्रकांत पाटील यांच्या कारचा अपघात

Chandrakant Patil's convoy car Accident : पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झालाय. चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत.
चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला पुण्यात अपघात झाला. सोमवारी रात्री पुण्यात एका व्यक्तीने दारुच्या नशेत दुचाकीने चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणताही दुखापत झालेली नाही. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आलंय.

मानाच्या गणपती दर्शनासाठी चंद्रकांत पाटील पुण्यात होते. त्यावेळी रात्री अचानाक त्यांच्या गाडीला एका दुचाकीने धडक (Chandrakant Patil News) दिली. यामध्ये कोणतेही मोठं नुकसान झाले नाही. पोलिसांनी दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला ताब्यात घेतलेय.

चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

काल १६ सप्टेंबर रोजी हा अपघात झालाय. रात्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला दारू पिऊन चालवणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिल्याचं समोर (Pune News) आलंय. या अपघातामध्ये गाडीचं नुकसान झालंय. परंतु चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती मिळतेय. चंद्रकांत पाटील सुखरूप आहेत. पुणे शहरात जात असताना हा अपघात झाल्याचं समजतंय.

चंद्रकांत पाटील
Ajit Pawar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते विधान महागात पडलं; अजित पवारांची पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी

चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

काल रात्री माझा मोठा अपघात झाला. दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या तरूणाच्या गाडीने धडक दिली. घटनेनंतर या तरूणाला त्याच्या मित्रांसह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावर गृहमंत्री काय करणार? असा सवाल त्यांनी (Chandrakant Patil Accident News) केलाय. मुलींचं शिक्षण मोफत केलंय, शेतकऱ्यांना वीज माफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, १० लाख तरूणांना रोजगार अशा अनेक योजना महायुती सरकारने राबवल्या आहेत. तर मनोज जरांगे पाटील यशाच्या एका उंच शिखरावर गेले (Maharashtra Politics) आहेत. तिथे ते सर्वांना समान न्याय देवून वागले तर ते नक्कीच मोठे नेते होतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil: पुणे विद्यापीठात अमली पदार्थ सापडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर? अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर नियमावली लागू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com