Pune Hadapsar Police
Pune Hadapsar Police SAAM TV

Pune Crime News : तरूण व्यावसायिकाला थाप मारून फ्लॅटवर नेले, फोटो काढले; त्यानंतर घडलं ते भयंकर...

Pune Crime News Update : बिझनेसबाबत बोलायचे असल्याचे सांगून तरूणीने एका तरूण व्यावसायिकाला फ्लॅटवर नेले. तिथे तरुणीने त्याच्यासोबत फोटो काढले.
Published on

सचिन जाधव

Pune Crime News Update : पुण्यातील हडपसर परिसरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिझनेसबाबत बोलायचं आहे असं सांगून तरूण व्यावसायिकाला फ्लॅटवर नेले आणि त्याच्यासोबत तरुणीने फोटो काढले. त्यानंतर बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून साडेसतरा लाख रुपये उकळले. या प्रकरणी एका वकिलाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. (Tajya Batmya)

बिझनेसबाबत बोलायचे असल्याचे सांगून तरूणीने एका तरूण व्यावसायिकाला फ्लॅटवर नेले. तिथे तरुणीने त्याच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्या व्यावसायिकाला बलात्काराची तक्रार करीन, अशी धमकी दिली आणि त्याच्याकडून १७ लाख ५० हजार रुपये लुटले. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी संशयित आरोपी वकिलाला अटक केली.

Pune Hadapsar Police
ED-CBI Raid At Beed Sugar Factory: शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी, सीबीआयचे छापे; कोट्यवधी रूपयांचा गैरव्‍यवहार

विक्रम (वय ३५, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तसेच निधी (वय २५, रा. वाघोली) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मगरपट्टा सिटी येथील एका ४२ वर्षांच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हडपसर परिसरात एका कार्यालयात ३ ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत हा प्रकार सुरू होता. या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Pune Hadapsar Police
Pune News : ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडल्याने MBBS विद्यार्थिनीचा मृत्यू, पोलिसांना वेगळाचा संशय

१८ लाखांचा गुटखा पकडला

पुण्यातील इंदापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. १८ लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासहीत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इंदापूर पोलिसांनी अकलूज - पुणे दरम्यान गुटख्याची अवैधपणे वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. १८ लाख रुपयांच्या गुटख्यासहित २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणात माल कुठे व कोणासाठी घेऊन निघाले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com