Pune News: बैल उधळले अन् गाडा थेट गर्दीत शिरला; धडक बसताच वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Bailgada Sharyat News: बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बैलाचा धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली.
Bailgada Sharyat News
Bailgada Sharyat NewsSaam TV

Pune Bhor Bailgada Sharyat

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बैलाचा धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली. विष्णू गेनबा भोमे (वय ७०) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. भोमे हे शिंद गावातील रहिवासी होते. बैलाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Bailgada Sharyat News
Mumbai News: टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग; तरुणाचं धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

रामनवमी आणि जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भोर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भोमे हे शर्यत पाहण्यासाठी भोर येथे आले होते. भोमे यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती.

एकेकाळी त्यांच्याकडे शर्यतीचा बैल होता. दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू असताना अचानक बैल उधळून भोमे यांच्या दिशेने आला. काही कळण्याच्या आत बैलगाड्याची त्यांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये भोमे गंभीर जखमी झाले.

त्यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला होता. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी भोमे यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, उपचार सुरु असताना भोमे यांच मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या काळामध्ये छंद म्हणून बैलगाडा शर्यती भरवल्या जात होत्या. मात्र, सध्या बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळे गावागावातील तरुण शेतकरी बैलगाडा शर्यतीच्या आहारी गेले असून कामधंदा सोडून बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी जात आहेत.

Edited by - Satish Daud Patil

Bailgada Sharyat News
Poisoning Plants : ड्रिल मशिनने 41 झाडांना छिद्र करून विषप्रयोग; घाटकोपरमधील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com