Poisoning Plants : ड्रिल मशिनने 41 झाडांना छिद्र करून विषप्रयोग; घाटकोपरमधील संतापजनक घटना

Poisoning Plants In Ghatkopar : नायडू कॉलनी येथील पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूस असलेली 16 पेल्टोफोरम, 02 सुभाबूळ व 01 पिंपळ या प्रजातीच्या वृक्षांना ड्रिलच्या सहायाने छिद्र करण्यात आलेत.
Poisoning Plants
Poisoning Plants Saam TV

घाटकोपर परिसरातील पूर्व द्रुतगती मार्गावर एक संतापजनक घटना घडली आहे. येथे रस्ता दुभाजकावरील ४१ झाडांवर विषप्रयोग करण्यात आला आहे. विषप्रयोग झाल्याचं समोर येताच पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Poisoning Plants
Akola Crime : अकोला हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर

शनिवारी सकाळी ही घटना उघडकील आलीये. बृहन्मुंबई महानगरपालीका येथे उद्यान सयाहक म्हणून कार्यरत असलेले कृष्णा लांबे यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. वृक्षांची पाहाणी करण्यासाठी ते आज सकाळी येथे पोहचले तेव्हा वृक्षांवर विषप्रयोग केल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

२२ फॉक्सटेल पाम, १६ पेल्टोफोरम, २ सुभाबूळ आणि एका पिंपळाच्या झाडाला कापले असून त्याला छिद्रा पाडून त्यात विषप्रयोग झालाय. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियमाअंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय. जाहिरातींच्या होर्डिंगसाठी वृक्षतोड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अज्ञात इसमाने बृहन्मुंबई महानगरपालिका यांची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे एजीएलआर व पुर्व द्रुतगती महामार्ग जंक्षन येथील ब्रिज ते रमाबाई आंबेडकर नगर येथील रस्ता दुभाजकामधील वृक्षांना अशा पद्धतीने मृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये 22 फॉक्स टेल पाम या प्रजातीच्या वृक्षांची कापणी करण्यात आलीये. तसेच नायडू कॉलनी येथील पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूस असलेली 16 पेल्टोफोरम, 02 सुभाबूळ व 01 पिंपळ या प्रजातीच्या वृक्षांना ड्रिलच्या सहायाने छिद्र करण्यात आलेत. ड्रिल मशीनने छिद्र करून त्यात विशारी रसायन टाकून वृक्ष मृत करण्याचा प्रयत्न झालाय.

Poisoning Plants
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियंता तरुणीवर अत्याचार, धर्म बदलून लग्नही लावले, तिघांविरोधात गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com