नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा, अवघ्या 60 दिवसांत खटला निकाली

नसरापूर बलात्कार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय...मात्र ही शिक्षा सुनावताना न्यायालयानं कोणती निरीक्षणं नोंदवली ? 60 दिवसात पीडित कुटुंबियांना कसा न्याय मिळाला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Court delivers death sentence to Bhimrao Kamble in the shocking Nasrapur child rape and murder case, ensuring justice within 60 days.
Court delivers death sentence to Bhimrao Kamble in the shocking Nasrapur child rape and murder case, ensuring justice within 60 days.saam tv
Published On

नसरापुरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळेला अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय...हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात नवा पायंडा पाडणारा ठरलाय. .. कारण अवघ्या ६० दिवसांच्या विक्रमी कालावधीत हा खटला निकाली काढण्यात आलाय. या निकालावेळी न्यायालयानं आरोपीच्या पाशवी कृत्य़ाचा पाढाच वाचलाय...

फाशीच्या शिक्षेवर न्यायाधीश काय म्हणाले?

- आरोपीनं शांत डोक्यानं चिमुकलीची हत्या करून तिला टॉर्चर केलं

- वासना पूर्ण करण्यासाठी हत्येनंतरही आरोपीनं चिमुकलीवर लैगिक अत्याचार केला

- मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा होत्या

- पीडितेचे कपडेही तिच्या तोंडात कोंबण्याचा क्रूरपणा आरोपीनं केला

- पुराव्यानुसार आरोपीनंच अत्याचार केल्याचं सिद्ध झालयं

- आरोपीला आजन्म कारावास आणि फाशीची शिक्षाही अपुरी

- केवळ 16 दिवसांत आरोपपत्र दाखल झालं

- नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेल्या या 12 केसमध्येही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय

- नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येतेय

- 'आता फासावर चढा' न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावून सांगितलं

दरम्यान अत्याचार प्रकरणात नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेच्या वडीलांनी निर्णयाचं स्वागत केलयं... मात्र"या शिक्षेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, तेव्हाच आम्हाला पूर्ण समाधान मिळेल," अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली...दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अशा प्रकरणात जलद निकाल देण्याचं ठरवल्यास सर्व शक्य आहे, असं म्हणत इतर प्रकरणांमध्येही अशाच पद्धतीनं जलद निकाल द्यावा, असं विधान केलयं...

नसरापूर प्रकरणातील निकालानं न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झालाय़....सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद आणि पुणे पोलिसांनी गोळा केलेले अचूक पुरावे यामुळे 2 महिन्यात पीडितेसह तिच्या कुटुंबियांनी न्याय मिळालाय...मात्र नसरापूर प्रकरणाप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणांमध्येही आरोपींना लवकरात लवकर आणि अशीच कडक शिक्षा होणार का? अशी अपेक्षा आता व्यक्त केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com