Pune Crime : अल्पवयीन भाच्याचा अन् मुलाचा वाद, मामाने पट्ट्याने बेदम मारलं; धारधार शस्त्राने छातीत वार करुन संपवलं

Pune Mama kills Bhacha : गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री त्याचा त्याच्या मामाच्या मुलाशी वाद झाला. वादातून मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने बेदम मारहाण केली.
Pune Narhe 15 year old boy murder
Pune Narhe 15 year old boy murderSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण काही करता कमी होत नाहीय. दररोज हत्या, बलात्कार यांसारख्या घटना घडत असल्याचं समोर येतंय. यातच आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून मामाने १५ वर्षीय भाच्याच्या छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात घडली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपी मामाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.

गजानन गजकोश (वय १५, रा.धारावी, कोळी वाड्याजवळ, मुंबई) असं खून झालेल्या भाच्याचं नाव आहे. तर या प्रकरणी मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याला अटक करण्यात आली आहे. गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री त्याचा त्याच्या मामाच्या मुलाशी वाद झाला. वादातून मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या छातीवर वार केला. चाकूने भोसकल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

Pune Narhe 15 year old boy murder
Saurabh Death Case : नवऱ्याचे तुकडे करुन ड्रममध्ये भरले, आरोपी मुस्कान जेलमध्ये काय काम करणार? बॉयफ्रेंड साहिल पिकवणार भाजीपाला

गंभीर जखमी अवस्थेतील गजाननला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आरोपी मेघनाथला रात्री उशीरा अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत किरकोळ वादातून आरोपी मेघनाथने भाच्याचा भोसकून खून केल्याची माहिती मिळाली आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

Pune Narhe 15 year old boy murder
Maharashtra Politics: ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण घेतलं हाती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com