पुणे हादरलं! हिंजवडी IT परिसरात युवतीचा खून करून झाडावर टांगला मृतदेह

मयत मुलीचा क्रूरपणे खून करून मृतदेह कोणाच्या हाती लागू नये म्हणून निर्जनस्थळी एका झाडावर टांगण्यात आला!
पुणे हादरलं! हिंजवडी IT परिसरात युवतीचा खून करून झाडावर टांगला मृतदेह | Hinjewadi Murder case
पुणे हादरलं! हिंजवडी IT परिसरात युवतीचा खून करून झाडावर टांगला मृतदेह | Hinjewadi Murder case SaamTvNews

Pune Hinjewadi Murder Case : पुण्यातील हिंजवडी (Hinjewadi) आयटी परिसरातील मुळा नदी जवळील अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकूणच हिंजवडी - मान ह्या आयटी (IT) परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मयत मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून जाऊ कुणाला सापडू नये म्हणून, मारेकऱ्यांनी मयत मुलीला मारून तिचा मृतदेह झाडावर टांगला आहे. मुलीचा मृतदेह अतिशय निर्जन स्थळी एका झाडावर मारून टांगण्यात आला आहे. (Pune - Murder of a young woman in Hinjewadi IT area and body hanging on a tree)

त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे. मयत मुलीचा खून जवळपास चार - पाच आठवड्यापूर्वी करून तिचा मृतदेह झाडावर टांगण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मयत मुलीचा मृतदेह पूर्णपणे वाळून गेला आहे. हिंजवडी पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पोस्टमॉर्टम आणि डीएनए टेस्टसाठी जवळील सरकारी हस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, शस्त्रविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तातडीने दाखल झाले आहेत. तसेच सदर मुलगी अल्पवयीन आहे कि प्रौढ? याबाबत अद्यापही माहिती नसून, घटनास्थळापासून काही अंतरावरच आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे मयत मुलगी इकडेच जॉब करत होती का? तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला आहे का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com