पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली
जागावाटपावरून काका-पुतण्या संघर्ष पुन्हा उफाळला
शरद पवार गटाचा कल पुन्हा महाविकास आघाडीकडे
महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण तापलंय. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय.मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकेत वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या बनत आहेत, अशीच एक युती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींची युती. पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींकडून युतीची चर्चा सुरू झाली होती, मात्र काही कारणास्तव काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या बिनसलंय. नेमकं दोन्ही राष्ट्रवादीची युतीची चर्चा कुठे फिस्कटली हे जाणून घेऊ
राज्यातील महापालिका निवडणुका खूप रोचक आणि चुरशीच्या होणार आहेत. कारण जवळपास २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र काही कारणांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची चर्चा फिस्कटली.
स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोजक्याच जागा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामुळे ही युती फिस्कली असल्याचं बोलले जात आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार मैदानात उतरलेत. आज सकाळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यासह अजित पवार शरद पवार गटातील इतर नेत्यांसोबतही चर्चा करत आहेत.
पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रबाबत अमोल कोल्हेशी चर्चा केल्यानंतर पुण्यातील स्थनिक नेत्यांनी चर्चा थांबवली. चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुभाष जगताप यांच्यासोबत अकरा वाजता होणारी बैठक अजित पवारांनी रद्द केली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुका युतीने लढवायच्या होत्या. त्याबाबत चर्चाही झाल्या मात्र दोन्ही पक्षांमधील चर्चा अनिर्णीत राहिली. वृत्तानुसार, युतीच्या चर्चेदरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या पक्षाला फक्त ३५ जागा देऊ केल्या. शिवाय राष्ट्रवादी (एपी) ने सर्व राष्ट्रवादी (सपा) उमेदवारांनी घड्याळ चिन्हाखाली निवडणूक लढवावी अशी अट घातली.
अजित पवारांच्या गटाची ही अट शरद पवारांच्या गटाला मान्य नव्हती. त्यांचे उमेदवार फक्त त्यांच्या निवडणूक चिन्ह "तुतारी" वरच निवडणूक लढवतील, असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. या मुद्द्यावरून युतीची चर्चा थांबली असल्याचं म्हटले जाते. शरद पवार गटाने अजित पवारांना पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर कोणताही निर्णय झाला नाहीये.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत एकमत न झाल्याने शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत परतलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत आणखी एक बैठक घेतली. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.