

उद्या पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणूक
भाजपकडून मंजुषा नागपुरे व परशुराम वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल
पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवड उद्या होणार आहे. भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाला पसंती दिली असली तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही यासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. उद्या महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून सगळ्या ११९ नगरसेवकांसाठी बैठक आयोजित केली गेली होती.
या बैठकीला भाजपचे गटनेते गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, महामंत्री राजेश पांडे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपस्थिती लावली. या बैठकीला वरिष्ठांकडून होणाऱ्या मार्गदर्शनासाठी सगळ्या नगरसेवकांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र वेळेचं बंधन न पाळता काही नगरसेवक यांनी उशिरा आपली उपस्थिती माऊली तर काही जणांनी तर थेट या बैठकीला दांडी मारली.
यावर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नवनिर्वाचित नगरसेवकांना खडेबोल सुनावले. आजच्या बैठकीसाठी नगरसेवकांनी वेळेचे पालन का केलं नाही त्यासोबतच लग्न तिथी असल्यामुळे काही नगरसेवक जर आले नसतील तर त्यांनी इथून पुढे आपली "प्रायोरिटी" काय आहे हे ठरवून घेणे अपेक्षित असल्याचं देखील घाटे यांनी स्पष्टोक्ती केली.
नगरसेवकांना संबोधित करताना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, "काही प्रभागातील नगरसेवक आजच्या बैठकीला का आले नाहीत, आले नसलेल्यांना किंवा तुमच्या तुमच्या प्रभागातील उपस्थितीत न राहिलेल्या नगरसेवकांना तुम्ही फोन केले का? आज ६ वाजले तरी नगरसेवक बैठकीसाठी पोहचले नाहीत.
आज लग्नतिथी जरी असल्यामुळे काही लोकं आले नसावेत पण इथून पुढे आपली "प्रायोरिटी" (प्राधान्य) बदलावी लागेल. महापालिकेत होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घ्या. उद्या मतदान करण्याची वेळ आली आणि तुम्ही वेळेवर पोहचला नाहीत तर? यामुळे या गोष्टींचे गांभीर्य घ्या.
"नव्याने जे सभागृहात येणार आहेत त्यांना उत्कंठा असते. महापालिकेत सर्व पक्षाचे मिळून १६५ नगरसेवक जरी असले तरी आपली उपस्थिती, आपला सभागृहातील वावर अख्खं पुणे शहर बघत असतं. आपण जे सभागृहात बोलतो, तिथे वर्तन करतो, ते सगळे बघत असतात. इतकचं नाही तर ज्या भागातून आपण निवडून आलो आहोत तिथले लोकं सुद्धा बघतात की आपण निवडून दिलेला नगरसेवक नक्की काय बोलतो आहे, कुठल्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतोय. यासाठी सर्वांनी सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सगळ्यांना विनंती आहे ज्या ज्या वेळेस सूचना येतील, पालिकेत सर्वसाधारण सभा असतील तेव्हा आपला वेळ देणे अनिवार्य असेल, अशा स्पष्ट भाषेत घाटे यांनी बैठकीत खडेबोल सुनावले.
पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी उद्या निवड होणार आहे. भाजपकडून नावावर शिक्कामोर्तब झाला असला तरी सुद्धा विरोधकांनी मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ दिलेली नाही. त्यामुळे उद्या महापौर, उपमहापौर पदासाठी महापालिकेत मतदान पार पडेल. दिवंगत नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे भाजपकडून उद्या महापौर अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव मांडला जाणार असल्याची माहिती आज देण्यात आली. तसेच उद्या महापौर आणि उपमहापौर निवड झाल्यानंतर अभिनंदन केल्यावर उत्सव साजरी करू नका, पुढे नंतर मोठा कार्यक्रम घेतला जाईल, ज्याला प्रदेश मधून नेते येतील असं सुद्धा सांगण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.