
सचिन जाधव, साम प्रतिनिधी
मुळामुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हजारो माशांचा मृत्यू झालाय. नाईक बेट परिसरात मृत माशांचा खच पडलाय. महापालिकेने याठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. हे दुषित पाणी कुठुन आले याचा शोध सुरू आहे. पुणे शहरातून मुळा आणि मुठा नदी वाहते. संगमवाडी येथे या दोन्ही नद्यां‘चा संगम होतो.
शहरातील मैलामिश्रीत पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने नदीचं पाणी प्रदूषित होत आहे. मैलमिश्रीत पाणी नदीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी महापालिकतर्फे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. मात्र रसायनमिश्रित पाणी नदीत आल्याने पाण्यातील मासे मृत पावले आहेत.
माशांचा मृत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेत. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवले आहेत. हे रसायनयुक्त पाणी नदीपात्रात कसे आले याचा शोध घेण्यात येत आहे. नाईक बेट परिसरात मृत माशांमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलीय. महापालिकेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल येत्या दोन ते दिवसांत येईल.
या अहवालानंतरच नदीपात्रातील माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. शहरात दिवसाला किमान ९०० एमएलडी सांडपाणी तयार होत आहे, त्यापैकी प्रतिदिन केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जात आहेत. पण तरीही ४५० एमएलडी घाण पाणी थेट नदीत येत आहे. मुठा नदीमध्ये फक्त सांडपणी येत आहे.
तर मुळा नदीमध्ये पिंपरी-चिंचवड भागातील कंपन्यांमधून सोडले जाणारे रसायनमिश्रीत केलेले विषारी पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये येऊन मिसळत आहे. त्यामुळे या नद्यांमधील पाणी सजीवांसाठी धोकादायक आहे. रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
नायडू मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी आणि नदी सुधारणेच्या नावाखाली नदीचा कमी झालेले पात्र याला जबाबदार असल्याचं नागरिक म्हणतात. दरम्यान केंद्राच्या नदी सुधारणा प्रकल्पाच्या नावावर मुळा-मुठा नदीच्या पात्राची रुंदी कमी झालीय. सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली नदीचे दोन्ही बाजूचे पात्र हे अरुंद झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.