
पुण्याची लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पुण्यात दुसरी महापालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील यांच्या विधानामुळे आता पुण्यात दोन स्वतंत्र महापालिकेबाबातच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसणे आणि प्रशासनाने महानगरपालिका चालवणे यामुळे प्रश्न निर्माण आहेत. महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. शहरात एक महापालिका असून चालणार नाही, शहराचा राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक विचार करून शहराचे काही भाग करावे लागतील. पीएमआरडीए म्हणजे महापालिका नव्हे, हा विचार करून पुण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याशिवाय पर्याय नाही.' असं विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात केलं.
मागील ५ वर्षे कोरोना आणि राजकीय अस्थिरता होती, हे मान्य करावे लागेल. मागील पाच वर्षे विस्कळीत गेलीत. नगरसेवक नसल्याने त्यामुळे विविध समस्य निर्माण झाल्यात. आता स्थिर सरकार आले आहे, त्यामुळे कामांना गती येईल. येत्या २२जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय लवकरच होणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महापालिकेच्या प्रभाग रचना आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. येत्या पंधरा तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुण्याच्या प्रश्नांना गती देण्यात येईल असेही ते म्हणाले. दरम्यान पुण्यात दोन महापालिका असल्या पाहिजे असं पुणेकरांनाही वाटत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात काही गावांचा समावेश झालाय.
त्यामुळे पुण्यात प्रचंड वाहतुकीचा प्रश्न आहे. वाढती लोकसंख्या खड्ड्यांचे प्रश्न, पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे. यासर्व गोष्टींचा पुणे महानगरपालिकेवरती भार आहे. त्यामुळे अग्रेसर जर व्हायचं असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहेत, तशीच पुणे महानगरपालिका देखील आहे. तर अतिरिक्त एक महानगरपालिका झाली तर लोकांची सोयी सुविधा आणि प्रश्न मार्गी लागतील, असं पुणेकर म्हणतात.
पुण्याचे दादा ते ठरवतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राजकारणासारखा कठीण विषय कोणता नाही कोणाच समाधान होत नाही. महायुतीच्या काळात विकासाची कामं सुरू झाली आणि मार्गी लागली. पुण्याच्या विकास आराखड्यावर लक्षं देणं गरजेचं आहे.विकास कामांबद्दल पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारून जागृत करणे गरजेचे आहे, असं पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.