MNS Pune Nilesh Mazire
MNS Pune Nilesh Mazire Saam Tv

राज ठाकरे यांच्या सभेआधी पुण्यात मनसेला धक्का; कट्टर कार्यकर्त्याचा पक्षाला रामराम

MNS Pune Nilesh Mazire : पुण्याच्या सभेआधी मनसेला मोठा धक्का बसला आहे
Published on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे 22 मे रोजी पुण्यात सभा घेणार आहे. मात्र पुण्याच्या सभेआधी (Raj Thackeray Pune Sabha) मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे ((MNS Nilesh Mazire) मनसे सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माझीरे मनसेला राम-राम ठोकणार असल्याने पुण्यात मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. (MNS Nilesh Mazire Resigns)

MNS Pune Nilesh Mazire
मोठी बातमी! राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून निलेश माझीरे यांची ओळख आहे. पुणे मनसे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यपद त्यांच्याकडे होते. मात्र काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे आता पक्षाला रामराम ठोकणार आहेत. माझीरे यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली आहे. लवकरच ते आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील सभा निश्चित झाली आहे. रविवारी २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे सभा होणार आहे. याअगोदर २१ मे रोजी नदीपात्र येथे राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तेथे सुरू असलेले मेट्रोचे काम, पावसाची शक्यता तसेच मैदान तयार करण्यासाठी असलेला अपुरा वेळ यामुळे हे ठिकाण रद्द करण्यात आले होते.

त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी केली. एकीकडे राज ठाकरे यांची पुण्यात सभा आणि दुसरीकडे वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा हाती घेत असल्याने मनसेत खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com