Maval News: सेल्फीने केला घात! मैत्रिणीला वाचवायला मित्र धावला, दोघेही बुडाले; कुंडमळा येथे तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Maval Breaking News: या घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या बचाव पथकांच्या अथक प्रयत्नानंतर रोहन ठोंबरे याचा मृतदेह सहा तासानंतर रेस्कु टीमच्या हाती लागला,
Maval News: सेल्फीने केला घात! मैत्रिणीला वाचवायला मित्र धावला, दोघेही बुडाले; कुंडमळा येथे तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Maval NewsSaam tv
Published On

मावळ, ता. ८ सप्टेंबर २०२४

Maval Kundmala Waterfall News: सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जाऊन तरुण- तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मावळ परिसरात घडली. मावळातील कुंडमळा येथील धबधब्याबर ही दुर्दैवी घटना घडली. तब्बल १२ तासांनंतर दोघांचेही मृतदेह हाती लागले असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मावळातील कुंडमळा धबधब्यातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिंचवड येथील सहा मुले आणि दोन मुली गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास येथे वर्षाविहारासाठी आले होते. त्यातील रोहन ज्ञानेशवर ढोंबरे, आणि श्रेया सुरेश गावडे हे दोघे सेल्फी काढण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. आधी श्रेया गावडे ही तरुणी पाय घसरुन पडली, त्यानंतर तिला वाचवायला रोहन ठोंबरे हा तरुण धावला अन् तो सुद्धा पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती. या बचाव पथकांच्या अथक प्रयत्नानंतर रोहन ठोंबरे याचा मृतदेह सहा तासानंतर रेस्कु टीमच्या हाती लागला, मात्र श्रेया गावडे या मुलीचा शोध इंद्रायणी नदीच्या पात्रात सुरू होता. त्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर श्रेया गावडेहीचा मृतदेह आज सापडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Maval News: सेल्फीने केला घात! मैत्रिणीला वाचवायला मित्र धावला, दोघेही बुडाले; कुंडमळा येथे तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

गणेशभक्तांच्या गाडीला अपघात!

सोलापुरात गणरायाची मूर्ती घेऊन निघालेल्या एका छोटा हत्ती आणि दुचाकी वाहनाला बल्करने धडक दिलीय. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. कुंभारी विडी घरकुल ते लष्कर परिसराकडे हे सर्व भक्त गणरायाची मूर्ती घेऊन निघालेले होते. मात्र रात्री 8 च्या सुमारास एका बल्करने या भक्तांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामुळे गाडीत असलेले नंदिनी म्हेत्रे-वय 15, गणेश मच्छा- वय 16, प्रशांत नवगिरे-वय 15, सुवर्णा चिन्नापागलू -वय 18, गोविंद काडे -वय 36 हे सर्व गणेश भक्त जखमी झाले आहेत.

Maval News: सेल्फीने केला घात! मैत्रिणीला वाचवायला मित्र धावला, दोघेही बुडाले; कुंडमळा येथे तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Ahmednagar Crime: थरारक... कांदा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तलवार कोयत्याने वार करत रोख रक्कम लुटली, नगर हादरलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com