

सचिन जाधव
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला, त्यावेळी ही घटना उघडकीस आली.
स्वप्निल रामभाऊ कणसे अस 34 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मुळ बीडमधील अंबेजोगाई येथील रहिवाशी असलेला स्वप्निल पुण्यातील शिवणे भागात राहात होता. (Pune News)
स्वप्निल पेंटींगचे काम करुन उदरनिर्वाह करत होता. स्वप्निलला दारुचे व्यसन असल्याने त्याचे घरातील इतर सदस्यांबरोबर सातत्याने वाद होत होते. काल वाद झाल्यानंतर स्वप्निल घरातून निघून गेला होता. (Latest Marathi News)
स्वप्निल घरी न आल्याने त्याच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाच्या अकरा नंबर मोरीजवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलीस तपासात मृत व्यक्ती स्वप्निल असल्याचं समोर आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.