Pune Lok Sabha Election: मलाही खासदार व्हायचंय! काँग्रेसने उमेदवारांचे अर्ज मागवताच लागली इच्छुकांची रांग; कोणाला मिळणार संधी?

Lok sabha Election: काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे पत्रक काढून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या अर्जात अरविंद शिंदे यांचा देखील अर्ज आहे. नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे दौरा केला होता. त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आली होती.
Pune Lok Sabha Election
Pune Lok Sabha ElectionSaam Tv
Published On

Pune Lok Sabha 14 Candidates Application:

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी सुरू केलीय. निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले. पक्ष कार्यालयात आलेले अर्ज पाहून काँग्रेसच्या वरिष्ठांची चिंता वाढणार आहे. कारण तब्बल १४ जणांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केलीय.(Latest News)

लोकसभा निवडणुकीचे आता सर्वांनाच वेध लागले आहेत, तर राजकीय पक्षांनीदेखील कंबर कसलीय. काँग्रेस पक्षानेही जोरदार तयारी सुरू केलीय. नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुणे दौरा केला होता. त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मागवण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Lok Sabha Election
Loksabha Election: लोकसभा निवडणुका मार्चआधीच जाहीर होणार? कोणते संकेत आणि चर्चा नेमकी कशामुळे?

पक्षाच्या आदेशानंतर आज संध्याकाळपर्यंत १४ जणांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे पत्रक काढून अर्ज करण्यास सांगितले होते. दरम्यान काँग्रेस हायकमांडकडून नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आमदार रवींद्र धंगेकर यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर माजी आमदार मोहन जोशींकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलीय.

Pune Lok Sabha Election
Solapur Lok Sabha : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नवख्या चेहऱ्याला संधी देणार? जयसिद्धेश्वर स्वामींच्या 'त्या' प्रकरणावर लवकरच निकाल

आत्तापर्यंत आले १४ इच्छुकांचे अर्ज

पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे स्वतःनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अरविंद शिंदे सह कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, आबा बागुल,संगीता तिवारी, पुण्यातील फेमस रेडिओ जॉकी आर जे संग्राम खोपडे यांनीही अर्ज केलाय. याचबरोबर बाळासाहेब शिवकर, रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे, अभय छाडेड, अनंत गाडगीळ, दीप्ती चौधरी, आबा बागुल, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, यशराज पारखी, मुकेश धिवारं, राजू कांबळे, मनोज पवार,संग्राम खोपडे ह्या १४ जणांनी अर्ज केले आहेत. दरम्यान कसबा पोटनिवडणूकप्रमाणे पुणे लोकसभाही काँग्रेस जिंकेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी विश्वास व्यक्त केलाय.

Pune Lok Sabha Election
Lok Sabha Election: राजू शेट्टी महाविकास आघाडीला साथ देणार? 'स्वाभिमानी'ला किती जागा मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com