पुण्यात फर्ग्युसन रोडवरील L3 बारमधल्या ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्यानंतर आज पुण्यातल्या मॉलमधल्या टॉयलेट्समध्येही सर्रास ड्रग्जचं रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे पोलिसांच्या नाकाखाली पुण्यनगरी ड्रग्जच्या सापळ्यात अडकत चालल्याचं उघड झालंय. या ड्रग्ज पार्ट्यांचा सूत्रधार अक्षय कामठे असल्याचं उघड झालंय. कोण आहे हा अक्षय कामठे आणि कसा सुरू आहे ड्रग्ज पार्ट्यांचा बाजार यावरचा हा विशेष रिपोर्ट..
शिक्षणाचं माहेरघर.पुण्यनगरी अशी एकेकाळी ओळख असलेलं पुणं ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललंय. विशेष म्हणजे शिक्षणासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा फर्ग्युसन रोड आता ड्रग्ज पार्ट्यांसाठी कुख्यात होत चाललाय. कारण या लिक्विड लिजर लाऊंज म्हणजे L3 बारमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ बाहेर आला आणि पुन्हा एखदा खळबळ माजली.
कुणी या लाऊंजमधल्या टेबलवर ड्रग्ज घेऊन झिंगतोय तर कुणी या हॉटेलच्या टॉयलेटमध्ये जाऊन ड्रग्ज घेतोय. हे मकी होंतं की काय आता पुण्यातल्या मॉलमध्येही सर्रास ड्रग्जचं सेवन सुरू असल्याचाही पर्दाफाश झालाय. दोन मुली खुशाल टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेत असल्याचं या व्हिडिओमधून उघड झालंय. त्यामुळे पुणे पोलिसांचा कोणताही धाक नसून ड्रग्ज माफियांचं जाळ चांगलंच पसरल्याचं दिसतंय.
या प्रकरणी पोलिसांनी मालक, त्याचे पार्टनर, पार्टी आयोजन करणा-यांसह 8 जणांचा अटक केलीय़. सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. मात्र या पार्टीचा मुख्य सूत्रधार अक्षय कामठे असल्याचं पुढं आलंय
अक्षय कामठे हा इव्हेंट ऑर्गनायजर आहे,. त्यानंच L3 बारमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं. अक्षयनं 40-50 जणांना L3 बारमध्ये आणलं होतं. पोलिसांना संक्षय येऊ नये म्हणून L3 चे मुख्य दार बंद करून पाठीमागच्या दरवानाजनं तरुणांना प्रवेश दिला होता. L3मध्ये येण्यापूर्वी याच 50 जणांनी हडपसरमध्येही पार्टी केली होती. डीजे, शेज, म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात अक्षय कामठेचा हातखंडा आहे. आत्तापर्यंत पुण्यात झालेल्या अनेक म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन कामठेनं केल्याचं समोर आलंय.
ड्रग्ज माफिया ललित पाटील नाशिकचा असला तरी पुण्यातल्या ससून रुग्णालयातून तो सगळी ड्रग्जची सूत्रं हलवत होता, त्यामुळे पुणे ड्रग्जची फॅक्ट्री होत चालल्याची त्याचवेळी स्पष्ट झालं होतं. आता नामांकीत कॉलेजेसच्या जवळच्या हॉटेल्समध्ये पहाटे उशिरापर्यंत या ड्रग्जच्या पार्ट्या रंगत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं.
हाकेच्या अंतरावर असलेलं डेक्कन पोलीस स्टेशन आणि पोलिसांच्या बिट मार्शलच्या नाकाखाली पहाटे पाच वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टी सुरू होती. त्यामुळे पोलिसांना याची कोणतीही खबर नव्हती की त्यांनी झोपेचं सोंग घेतलं होतं याबाबत आता शंका निर्माण होतेय. यामुऴे मात्र पुणे शिक्षणाची नव्हे तर ड्रग्जची पुण्यनगरी होत चाललीय एवढं मात्र खरं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.