Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? १२-१३ जमावांकडून तरूणाला मारहाण, लोखंडी रॉडनं डोकच फोडलं

Pune viral fight video: एका कंपनीत कंत्राट मिळण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. एका तरूणाला १२-१३ जणांनी मिळून लोखंडी रॉडनं मारहाण केली आहे. यात त्याच्या डोक्याल दुखापत झाली आहे.
Pune
PuneSaam Tv News
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुण्यात गुन्हेगारांचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील खेडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका कंपनीत कंत्राट मिळण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. खेड सिटीतील कंपनीच्या गेटवर हा सगळा राडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

पुण्याच्या खेड तालुक्यातील सिटी इंडस्ट्रीअल एरियात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. एका नामांकित कंपनीच्या गेटवर हा संपूर्ण राडा झाला आहे. दोन्ही गट एकाच गावातील असून, आसपासच्या परिसरातील असल्याची माहिती आहे. त्यांची एकमेकांशी ओळख देखील आहे.

Pune
Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना फसवी, वृद्ध कलाकार माझ्यासमोर रडतात', ठाकरे सेनेच्या खासदारानं तोफ डागली

एका कंपनीत या दोन्ही गटांना वेगवेगळी कंत्राटं मिळवायची होती. कैलास तांबे यांची काही वाहनं कंपनीशी जोडलेली आहेत. तर, भाऊ अजित तांबे पाण्याचे जार पुरवतात. २८ फेब्रुवारीला अजित पाण्याचे जार द्यायला गेला होता. तर, त्या ठिकाणी दुर्गेश गाडे, अभी बो-हाडे, शुभम मोदगेकर असे मिळून १२ ते १३ जण तिथे आले.

१२ - १३ जणांनी मिळून अजितला मारहाण करायला सुरूवात केली. कंपनीच्या गेटवर सुरू झालेला वाद कंपनी गेटच्या आतपर्यंत पोहचला. यात लाठ्या-काठ्या, रॉड, बॉटल आणि कंपनीतील इतर साहित्यांचा वापर करून मारहाण करण्यात आली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परस्परविरोधी गुन्हे दाखल केला आहे. खेड पोलिसांनी चौघांना अटक केली असून, इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.

Pune
Beed News: बीडमध्ये गुंडाराज सुरूच, लाथा-बुक्क्यांनी अन् रॉडनं मारहाण; रूग्णालयातही गुंडांची दहशत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com