Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना फसवी, वृद्ध कलाकार माझ्यासमोर रडतात', ठाकरे सेनेच्या खासदारानं तोफ डागली

Uddhav Thackeray faction latest news: लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालेलं नाही. ठाकरे सेनेच्या खासदारांचा आरोप. लाडकी बहीण योजना फसवी असल्याचीही केली टीका.
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहीट ठरली. दरमहा १५०० रूपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. सत्ता स्थापन झाल्यानंतर १५०० नसून २१०० रूपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या सरकारमधील काही नेत्यांनी दिलं होतं.

मात्र, अद्याप सरकारकडून कोणत्याच प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावर धरत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना फसवी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

'लाडकी बहीण योजना फसवी आहे. हे आपण निवडणुकीनंतर पाहिलं असेल. महायुती सरकार निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रूपये देणार होते. आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत. त्यांनी ते शक्य नाही असं सांगितलं. ही महिलांची फसवणूक आहे', असं संजय राऊत म्हणालेत.

Ladki Bahin Yojana news
Beed News: बीडमध्ये गुंडाराज सुरूच, लाथा-बुक्क्यांनी अन् रॉडनं मारहाण; रूग्णालयातही गुंडांची दहशत

वृद्ध कलाकार रडत होते

'मला काही वृद्ध कलाकार भेटले होते. त्यांना दर महिन्याला सरकारकडून काही मानधन मिळतं. त्यांनी मला सांगितलं की, लाडकी बहीण योजना अंमलात आल्यापासून वृद्ध कलाकारांना त्यांचं मानधन मिळालेलं नाही. या राज्याची ही आर्थिक अवस्था आहे. हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतंय. वृद्ध कलाकार माझ्याकडे अक्षरक्ष: रडत होते', असं संजय राऊत म्हणालेत.

Ladki Bahin Yojana news
Chanakya Niti: पैसा खिशात टिकतच नाही,'या' ३ सवयी आजच सोडा..

'महायुती सरकारनं महिलांना २१०० रूपये द्यायचं कबूल केलं होतं. पण हे सरकार १५०० वरून २१०० रूपये पैसे द्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. मग ही योजना फसवी नाही का?' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com