Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

Pune Crime News: बदलापूरनंतर पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याच्या घटनेला 24 तास उलटले नाहीत तोच बोपदेव घाटात गँगरेपची घटना घडलीय.. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटनांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...
Pune NewsSaam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडलीय. पुण्याच्या बोपदेव घाटातही आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्काराची हादरवणारी घटना घडलीय. बोपदेव घाटात नेमकं काय घडलं, हेच जाणून घेऊ...

पुण्याजवळ बोपदेव घाटात तरुण-तरूणी फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास घाटात गप्पा मारत होते. बाईकवरून आलेल्या तिघांनी दोघांना धमकावलं. यानंतर तरूणीच्या मित्राला तिघांनी बांधून ठेवलं. तिघांनी तरूणीवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करून तिघे आरोपी फरार झाले. पुढे मित्राने पीडित तरूणी रुग्णालयात दाखल केलं. या सामुहिक अत्याचाराची पहाटे 5 वाजता पोलिसांना माहिती मिळाली आणि तपासाची चक्रं फिरवत आरोपींना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...
Maharashtra Politics: भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; आणखी धक्के बसणार, शरद पवारांचा महायुतीला इशारा

नुकतच पुण्यातील स्कूल व्हॅनमध्ये 6 वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं त्याला 24 तासही उलटले नाहीत तोच पुण्यात आणखी एक अत्याचाराची घटना घडलीय..मात्र पुण्यात या दोनच घटना घडल्या नाहीत तर विद्येचं माहेरघर असलेलं गुन्हेगारांचं माहेरघर बनल्याचं चित्र निर्माण झालंय.

गुन्हेगारीचं माहेरघर पुणे

27 सप्टेंबर - नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

30 सप्टेंबर- स्कूल व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुकल्यांवर अत्याचार

2 ऑक्टोबर- बोपदेव घाटात अपहरण करून तरुणीचा विनयभंग

3 ऑक्टोबर- बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक अत्याचार

1 ऑक्टोबर - धावत्या वाहनावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...
Sharad Pawar: 'आरक्षणाची मर्यादा वाढवा', शरद पवार यांनी सांगितला आरक्षणाचा नवीन फॉर्म्युला; वाचा...

विद्येचं माहेरघर,सांस्कृतिक पुणे अशा बिरुदावल्या मिरवणारं पुणे गेल्या काही वर्षात गुन्हेगारांचं माहेरघर बनलंय. कधी पोर्श कारनं निष्पांपाना चिरडलं जातं, तर कधी ड्रग्जचे साठे तर कधी चिमुकल्यांवर अत्याचार अन् आता चक्क गँगरेप...पुण्याची वाताहत होतेय..त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या स्तरावर पुणे सपशेल अपयशी ठरलंय. त्यामुळे गरज आहे ती अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचायची, ठोस उपाययोजनांची.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com