Pune Crime : माजी मंत्र्याच्या भावाची मुजोरी, वर्गणीसाठी डॉक्टरला दवाखान्यात जाऊन मारलं, पाटलांच्या गुंडगिरीने इंदापुरात संताप; VIDEO

Doctor Beaten up by Udaysinh Patil : हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील हे वर्गणी मागण्यासाठी दवाखान्यात आले होते. मात्र, डॉक्टर जेवण करण्यासाठी गेले असल्याकारणाने डॉक्टरांना उशीर झाला.
Former Minister Harshvardhan Patil brother Udaysinh Patil beaten doctor
Former Minister Harshvardhan Patil brother Udaysinh Patil beaten doctorSaam Tv News
Published On

सागर आव्हाड, साम टिव्ही

पुणे : पुण्यातील इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे इंदापुरात डॉक्टर सुरक्षित आहेत की नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील हे वर्गणी मागण्यासाठी दवाखान्यात आले होते. मात्र, डॉक्टर जेवण करण्यासाठी गेले असल्याकारणाने डॉक्टरांना उशीर झाला. त्यामुळे रागाच्या भरात उदय पाटलांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.

सदरील घटना ही हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामुळे आता उदयसिंह पाटील यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. उदयसिंह पाटलांनी इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्थांवर चेअरमन पद देखील भूषवलं आहे.

Former Minister Harshvardhan Patil brother Udaysinh Patil beaten doctor
Caste Census : अखेर ठरलं ! सरकार जातनिहाय जनगणना करणार, काँग्रेसकडून स्वागत; प्रतिक्रिया देत म्हणाले...

गावातील भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीतील काही लोक वर्गणी मागण्याकरिता बावडा गावातील डॉ. भागवत जाधव यांच्या खासगी रुग्णालयात गेले होते. याच ठिकाणी त्यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली. या दरम्यान उदयसिंह उर्फ भैय्यासाहेब पाटील यांनी डॉक्टरला लागोपाठ तब्बल तीन कानशिलात लगावल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. काल मंगळवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. नेमकी ही मारहाण का झाली? डॉक्टर आणि यात्रा कमिटी यांच्यात वाद का झाले? याचं ठोस कारण पुढे आलेलं नाही. शिवाय यासंदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Former Minister Harshvardhan Patil brother Udaysinh Patil beaten doctor
Cast Census : PM मोदींनी विरोधकांच्या हातातून महत्वाचा मुद्दा हिसकावला; जातनिहाय जनगणनेचा कुणाला फायदा अन् कुणाचं नुकसान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com