Pune News: धुराचे लोट अन् आरडाओरडा; पुण्याजवळ धावत्या ट्रेनमध्ये आग, प्रवाशांची पळापळ| VIDEO

Pune Train Fire: पुण्याजवळ धावत्या ट्रेनमध्ये आग लागली. दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News: धुराचे लोट अन् आरडाओरडा; पुण्याजवळ धावत्या ट्रेनमध्ये आग, प्रवाशांची पळापळ| VIDEO
Pune Train FireSaam Tv
Published On

पुण्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दौंडमधून दररोज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन सुटते. नेहमीप्रमाणे ही ट्रेन आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली पण अचानक ट्रेनच्या एका डब्यात आग लागली आणि गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड-पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली. दौंडवरून दररोज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन सुटते. या ट्रेनला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले. किंकाळ्या, आरडाओरडा अन् सर्वांची पळापळ झाली. इंजिनपासून तिसऱ्या बोगीत आग लागली. आग लागल्याचे कळताच ट्रेन थांबवण्यात आली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Pune News: धुराचे लोट अन् आरडाओरडा; पुण्याजवळ धावत्या ट्रेनमध्ये आग, प्रवाशांची पळापळ| VIDEO
Pune Indrayani Bridge Collapse : त्यांना वाचवा...त्यांना वाचवा...महिलेच्या किंकाळ्या अन्...; पूल कोसळल्याचा चित्तथरारक VIDEO समोर

दौंड - पुणे डेमू ट्रेन दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली. त्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता. दरवाजा लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता. या व्यक्तीने आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले. या डब्यामध्ये धूर देखील पसरला होता त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.

Pune News: धुराचे लोट अन् आरडाओरडा; पुण्याजवळ धावत्या ट्रेनमध्ये आग, प्रवाशांची पळापळ| VIDEO
Pune : शिक्षणाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार, पुण्यातील १३ शाळा अनधिकृत, २४ शाळा जागेवरच नाहीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com