Pune Crime : पेट्रोल पंपावर सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या लेकीलाच शिकार बनवलं; आईनेच बनवले मुलीचे अश्लील व्हिडिओ

Pune Love Story of Mother : पुण्यातील बिबडेवाडी येथे तक्रारदार मुलीची आई सिक्युरीटी गार्डचं काम करत होती, तेथील एका पेट्रोल पंपावरील कामगारासोबत तिचं सूत जुळलं होतं. त्यातून, त्या कामगाराचं घरी येणं-जाणं वाढलं.
 Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv News
Published On

पुणे : प्रियकराच्या मदतीनेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पोटच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ काढत नराधम आईनेच ते स्वतःच्या प्रियकराला आणि नातेवाईकांना पाठवले. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी आता या नराधम आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. त्यानंतर, आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं आईसह तिच्या प्रियकर आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ६ महिन्यांपूर्वीच या दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्पवयीन मुलीनं आईचे आणि आईच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घर मालकाला सांगितल्यानं आईने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. भारती विकास कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात १३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आई आणि तिचा प्रियकर फरार झाले होते.

 Pune Crime News
Wardha Bus Accident : भरधाव बसचं स्टेअरिंग अचानक लॉक, चालकाचं डोकं चालेना, ST डिव्हायडरला जाऊन धडकली, अन्...

पुण्यातील बिबडेवाडी येथे तक्रारदार मुलीची आई सिक्युरीटी गार्डचं काम करत होती, तेथील एका पेट्रोल पंपावरील कामगारासोबत तिचं सूत जुळलं होतं. त्यातून, त्या कामगाराचं घरी येणं-जाणं वाढलं. मात्र, ही बाब मुलीला आवडत नसल्यानं तिने घरमालकास याबाबत माहिती दिली. त्यावरुन, माय-लेकीत वाद निर्माण झाला होता. सोलापूर, कोल्हापूर येथे गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही फिरत होते. मात्र, 'आम्हाला २ दिवसांपूर्वी तांत्रिक माहिती मिळाली आणि माहिती मिळताच आम्ही खडकवासला येथून दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, दोघांनाही २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे', अशी माहिती पुण्यातील पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

 Pune Crime News
Yavatmal Crime: वाद गेला टोकाला अन् मोडली सात जन्माची शपथ; पत्नीवर केला लोखंडी रॉडचा वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com