Pune News : भाजपच्या माजी नगरसेविकेचे पुण्यात निधन

BJP Corporator Passed Away: पुण्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविकाचं निधन झालं आहे. ही घटना बुधवारी (३ एप्रिल) रात्री अकरा वाजता घडली आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका
BJP Corporator Shital Dnyaneshwar ShindeSaam Tv

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Pune Former BJP Corporator Passed Away

पुण्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविकाचं निधन झालं आहे. ही घटना बुधवारी (३ एप्रिल) रात्री अकरा वाजता घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे (BJP Corporator Shital Dnyaneshwar Shinde) (वय ४१) यांचे बुधवारी रात्री अकरा वाजता दुःखद निधन झालं आहे. (latest political news)

वडगाव शेरी येथून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या. एक महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. त्या अंगणामध्ये सॅनिटायझर टाकून (BJP Corporator) पालापाचोळा पेटवत होत्या. त्यावेळी सॅनिटायझरचा भडका झाल्यामुळे आगीत त्या भाजल्या होत्या. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा इन्फेक्शन झालं. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली (BJP Corporator Passed Away) होती. ३ एप्रिल रात्री अकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला, त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पुणे शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे या पुणे महानगरपालिकेची २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलं (Pune News) होतं. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली होती. नागरिकांची त्यांना चांगलीच पसंती होती.

भाजपच्या माजी नगरसेविका
Vijender Singh Joins BJP: काँग्रेसला धक्का! बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश; लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

त्यांनी वडगाव शेरी भागातील अनेक विकास कामांमध्ये पुढाकार घेतला होता. तसंच मोठा निधी पुणे महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिला होता. शांत, मनमिळावू स्वभाव आणि मितभाषी म्हणून त्या परीचित (Pune Former BJP Corporator) होत्या. नागरिकांचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं. त्यांच्या मृत्यूमुळे मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या माजी नगरसेविका
Jayant Patil On BJP Mission 45 Plus : महायुतीचे उमेदवार ठरण्यापूर्वीच काेल्हापूर, सातारा लाेकसभा मतदरासंघात जयंत पाटलांचा विजयाचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com