
बावधन येथील शिंदेनगर जवळील एका स्टुडिओला आग लागल्याची माहिती मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी सात जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. आग शमविण्यासाठी वारजे, पाषाण, कोथरूड ,एरंडवणे,औंध,वारजे येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र अद्याप आगीचं कारण कळू शकले नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ०५•५२ वाजता बावधन,शिंदेनगर येथे एका दुकानामध्ये आग लागली अशी. आग लागल्याची माहिती मिळताच कोथरुड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाची वाहने रवाना करण्यात आली. आग जेथे लागलीय ती एक पाच मजली इमारत असून येथे असणाऱ्या एका फोटो स्टुडिओला आग लागली होती. तेथील फ्लेक्स, फोटो फ्रेम व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. त्याचबरोबर तेथील तीन सदनिकांना ही आगीची झळ बसली असून नुकसान झाले आहे.
या घटनेत इमारतीत धुरामध्ये अडकलेल्या ७ नागरिकांना जवानांनी बाहेर काढून प्राथमिक उपचारा करिता रुग्णालयात रवाना केले आहे. आगीवर चार ही बाजूने पाण्याचा मारा सुरू ठेवत ०६•४५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू केलं गेलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.