पुणे: वरातीत नाचताना हाणामारी; गुन्हेगार तरुणाचा दगडाने ठेचुन खुन!

भावकीच्या लग्नाच्या वरातीत नाचताना मित्रासह भावकीतील तरुणांची हाणामारी झाल्याने भावबंदकीतील किरकोळ वादातुन गुन्हेगारीतील तरुणाचा दगडाने ठेचुन खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Pune Crime
Pune Crimeरोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर: भावकीच्या लग्नाच्या वरातीत नाचताना मित्रासह भावकीतील तरुणांची हाणामारी झाल्याने भावबंदकीतील किरकोळ वादातुन गुन्हेगारीतील तरुणाचा दगडाने ठेचुन खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे.

निर्घृण खुन करुन तरुणाचा मृतदेह चास-कमान धरणाच्या डाव्या कालव्यात फेकण्यात आला. त्यामुळे मृतदेह शोधण्याचे पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकत्र दारु पित असताना वाद झाला होता. शंकर नाईकडे असे निर्घृण खुन झालेल्या गुन्हेगार तरुणाचे नाव आहे.

Pune Crime
अमेरिकेतील टेक्सासमध्ये अंदाधुंद गोळीबार; 18 विद्यार्थ्यांसह एकूण 21 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कडधे गावात नाईकडे कुटुंबातील तरुणाचा विवाह झाल्यानंतर रात्रीच्या वेळी वरातीचा कार्यक्रम सुरु होता यादरम्यान मयत शंकर नाईकडे यांच्या भावकीतील काही तरुणांसह गावातील इतर तरुण एकत्र दारु पित असताना किरकोळ कारणावरुन वाद झाला त्यानंतर पुन्हा वरातीत नाचत असताना शंकर याच्याबरोबर पुन्हा वाद झाला..

हे देखील पाहा-

किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होत असताना ८ ते ९ तरुणांनी एकत्र येऊन शंकरच्या डोक्यात दगड टाकुन निघृण खुन केला. त्यानंतर मृतदेह चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यात टाकला. यावेळी कालव्यातुन पाण्याचा मोठा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे मृतदेह पाण्यात वाहुन गेला असुन राजगुरुनगर पोलीसांची दोन टिम मृतदेह शोधकार्य सुरु आहे. शंकर नाईकडे याच्या चाकण परिसरात हत्या, प्राणघातक हल्ला या प्रकरणी गुन्हे दाखल आहे.

वासुदेव बोंबले,पवन बोंबले (दोघेही रा. वेताळे, ता. खेड) वस्वप्नील सावंत,निलेश नाईकडे,ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे (सर्व रा. कडधे, ता. खेड) यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, आरोपीच्या पत्नी सुषमा शंकर नाईकडे यांनी तक्रार नोंदवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com