शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे
शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणेगोपाल मोटघरे

पुणे: तिकिटाच्या वादातून बसमध्ये दारूड्यांची महिला कंडक्टरला मारहाण अन् शिवीगाळ

पुण्यात पी एम पी एम एल बस मध्ये दोन दारुड्यांनी बसच्या वाहक महिलेला आणि काही प्रवाशांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
Published on

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यात पी एम पी एम एल बस मध्ये दोन दारुड्यांनी बसच्या वाहक महिलेला आणि काही प्रवाशांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे. (Pune Crime News)

पी एम पी एल (PMPL) बसची तिकीट काढण्यास सांगितल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून दोन दारुड्यांनी पीएमपीएमएल बस वाहक शीतल केशभाट हिला आणि काही महिला प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे
Amol Mitkari: गुजरात फाईल्स नावाचा सिनेमा काढला पाहिजे, मिटकरींचे भाजपला चिमटे

या प्रकरणात महिला वाहकाच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दोन दारुड्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी लगेच गोविंद अवतारे आणि जय कांबळे या दोन्ही दारुड्यांना अटक केली आहे.

हे देखील पहा-

गोविंद अवतारे आणि जय कांबळे हे पुणे महापालिका भवन ते ते निगडी या मार्गावर PMPML बसमधून रात्री प्रवास प्रवास करत होते, त्यावेळी महिला वाहकाने त्यांना तिकीट काढण्यास सांगितले, मात्र त्यांनी तिकीट काढले नाही.

दोन्ही आरोपीं हे पूर्णपणे दारूच्या धुंदीत होते. त्यामुळे त्यांनी बसच्या वाहकाची आणि बस मधील काही महिला प्रवाशांशी वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केली आहे. याप्रकरणी पीएमपीएमएल बस च्या वाहक महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com