मुंबई: भाजप काश्मीर फाईल्स या सिनेमाच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे. तर, भाजपच्या मनात झुंडबाबत तिरस्कार का आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, आगामी काळात गुजरात फाईल्स नावाचा सिनेमा काढावा असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे (Amol Mitkari Criticize BJP Over The Kashmir Files Movie).
मी जितके चित्रपट पाहिले, जर इंटरवलच्या पुढे माणूस झोपला तर तो काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) आहे. त्यात इतकं काही खास नाही. भाजपच्या (BJP) मनात झुंडबाबत तिरस्कार का आहे. गुजरात फाईल्स नावाचा सिनेमा आगामी काळात काढला पाहिजे, असा टोला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लगावला.
भाजप सिनेमाच्या नावाखाली राजकारण करतंय - मिटकरी
भाजप सिनेमाच्या नावाखाली राजकारण करत आहे. झुंडमधून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो, मात्र काश्मीर फाईल्स मधून काहीही घेऊ शकत नाही, त्यात मुस्लिम द्वेष दाखवला आहे, अशा आरोपही त्यांनी केला आहे.
आज महाराजांची जयंती साजरी का करायची - मिटकरी
19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती (Shiv Jayanti) राज्यभारत साजरी झाली. त्यांच्या तिथीचा वाद करायचा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेऊन पुन्हा राजकारण केलं जात आहे. 19 फेब्रुवरीला जयंती साजरी झाली आहे, मग आज साजरी का करायची, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
तिथीचं फॅड काढून आता राजकारण सुरु - मिटकरी
पुन्हा एकदा तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काही पक्ष शिवाजी महाराज यांना संभ्रमात अडकवायचा काम करत आहे. शिवजयंती रोजही साजरी झाली, तर त्याला दुमत नाही. पण, तिथीनुसार साजरी करु हा हट्ट का, 19 फेब्रुवारी हा दिवस ठरवलेला आहे. तिथीचं फॅड काढून आता राजकारण सुरु आहे, असं म्हणत त्यांनी मनसेवर (MNS) निशाणा साधला आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.