Pune Crime News: विद्येच्या माहेरघरात 'डीआरआय'ची मोठी कारवाई; तब्बल ५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले जप्त

Pune News: पुण्यात 'डीआरआय'ने मोठी कारवाई केली आहे.
pune crime news
pune crime newsSaam tv
Published On

अक्षय बडवे

Pune News:

पुण्यात 'डीआरआय'ने मोठी कारवाई केली आहे. डीआरआय उर्फ महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करत तब्बल ५० कोटी रुपयांचे मेथाक्‍वालोन जप्त केले आहे. 'डीआरआय'ने विद्येच्या माहेघरात मोठी कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर सं चालनालयाने 101.31 किलो मेथाक्‍वालोन (सायकोट्रॉपिक पदार्थ) जप्त केला आहे. मेथाक्‍वालोन हा सायकोट्रॉपिक पदार्थ असून झोपेसाठी तसेच संमोहनासाठी त्याचा वापर केला जातो.

pune crime news
Nashik Crime News: मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मारहाण करत तरुणाची हत्या; अंबडमधील धक्कादायक प्रकार

डीआरआय पुणे प्रादेशिक युनिटने मेथाक्‍वालोन असल्‍याचा कथित 101.31 किलो सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त केला आहे. डीआरआय, पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे.

डीआरआयकडून अटक करण्यात आलेले लोक बेकायदेशीर विक्री/खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सायकोट्रॉपिक पदार्थ आणि कार्टेल भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले असू शकतात. तसेच त्यांचे परदेशातही संबंध असू शकतात. या अनुषंगाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली. पोलिसांनी १ कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त केले. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत यांना अटक केली आहे. आरोपींची टोळी राजस्थानची असल्याची माहिती आहे.कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

pune crime news
Rajasthan Crime News: हे कसलं प्रेम! धावत्या दुचाकीवरुन शिक्षिकेवर तलवारीने सपासप वार; महिलेवर उपचार सुरू

प्राप्त माहितीनुसार, पुणे पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवर छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी ६४ लाख २८ हजार रुपये किमतीचे ३ किलो २१४ ग्रॅम अफीम जप्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com