Pune Cyber Fraud
Pune Cyber Fraud SAAM TV

Pune Cyber Fraud : १८ बँका, ४१ खाती अन् दिल्ली कनेक्शन; विम्याच्या बहाण्यानं डॉक्टरला २ कोटींना गंडा

Pune Crime News : विमा पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरला २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News : विमा पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरला २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी चोरट्याला दिल्लीतून अटक केली. (Crime News)

आरोपींनी डॉक्टरांकडून पैसे घेताना तब्बल १८ बँकेतील ४१ खात्यांचा वापर केला होता. देशभरातील अनेक राज्यांमध्ये या टोळीने अशा प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Pune Cyber Fraud
Pune News: दगडखाण कामगारांचा लेकराबाळांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च

शहवान सलीम अहमद (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी या अगोदर संदीपकुमार पुत्र धर्मपाल, साहिब खान नसीर अली, आजिब खान अकिल अहमद यांना अटक केली होती.

आरोपींचे दिल्ली कनेक्शन उघड

या गुन्ह्यातील आरोपी शहवान अहमद पसार होता. शहरातील एका नामांकित डॉक्टरला विमा पॉलिसीत गुंतवणूक केल्यास फायदा होईल तसेच नफाही मिळेल, असे आमिष दाखविले होते.

त्यानंतर डॉक्टरला वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेळोवेळी २ कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात भरायला लावले होते. सायबर पोलिसांनी या सर्व खात्यांची माहिती घेऊन दिल्लीतून तिघांना अटक केली होती.

Pune Cyber Fraud
Pune Crime News: पुणे हादरलं! अवघ्या 1500 रुपयांसाठी तरुणाने एकाला संपवलं

पोलिसांची दमदार कामगिरी

शहवान अहमद याचा शोध घेत असताना तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. शहवान याचा शोध घेऊन त्याला पकडण्यात आले. दिल्लीतील न्यायालयाकडून कोठडी मिळवून पोलिसांनी शहवानला पुण्यात आणले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com