Satbara: मोठा निर्णय! आता १०० वर्षांपूर्वीचाही सातबारा काढता येणार; एका क्लिकवर होणार सर्व कामं

Pune District Satbara News: आता तुम्हाला १०० वर्षांपूर्वीचेही सातबारा उतारे काढता येणार आहे. यासाठी कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर एका क्लिकवर दाखले उपलब्ध होणार आहेत.
Satbara
SatbaraSaam Tv
Published On
Summary

आता १०० वर्षांपूर्वीचेही सातबारे काढता येणार

७ कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम सुरु

महिन्याभरात काम पूर्ण करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सातबारा काढणे आता खूप सोपे झाले आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटात डिजिटल सातबारा काढू शकतात. पुणे जिल्ह्यातील सातबारा उतारा, जन्म मृत्यूंच्या दाखल्यांसह सात कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम ६० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. ही सर्व कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिले आहे.

Satbara
Pune News : पुण्यात हॉटेलचा स्लॅब कोसळला, २ जण दबले; रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

कागदपत्र स्कॅनिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खूप जुने उतारेदेखील एका क्लिकवर मिळणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुण्यातील जुने उतारे स्कॅन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. पणे जिल्ह्यात एकूण १३ तहसील कार्यालये, ११ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, ३ नगरभूमापन कार्यालय आहे. या एकूण २७ कार्यालयांमधील तीन कोटी २१ लाख कागदपत्रे स्कॅन करण्यात येणार आहे. यासाठी ६० लाख कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Satbara
EPFO: खासगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० होणार? सरकारने स्पष्टच सांगितलं

या कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरु

पुण्यातील विविध तालुक्यांमधील १०० वर्षांपूर्वीचे सातबारे, १९३० पासूनचे जन्म मृत्यूचे दाखले, फेरफार, आठ अ, कडई पत्र, इनाम पत्र ही सात कागदपत्रे स्कॅन केली जात आहे. यामध्ये ३ कोटी ३१ लाख ४७३ कागदपत्रांचे स्कॅनिंग करायचे आहे. त्यातील दोन कोटी ३८ लाख ६२२ कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यातील १ कोटी ५७ लाख कागदपत्रे स्कॅन झाले आहेत. ८० लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग बाकी आहे.

या कागदपत्रांचे स्कॅन झाल्यानंतर या प्रती वाचता येतात का हे चेक केले जाईल. यानंतर मेटा डेटा एन्ट्री केली जाईल. याची पत्र जमावबंदी आयुक्तालयाकडे पाठवली जाईल. त्यांच्याकडून तालुकानिहाय पडताळणी केली जाईल. यानंतर सातबारा डिजिटल उपलब्ध होईल.

Satbara
Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com