श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा; महिलेसोबतचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तक्रार दिली होती.
Shrikant Deshmukh News Update
Shrikant Deshmukh News UpdateSAAM TV
Published On

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेचा आणि भाजपचे सोलापूरचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Shrikant Deshmukh News Update
श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार

भाजपचे सोलापूर येथील बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) आणि पीडित महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला होता. या प्रकारानंतर खळबळ उडाली होती. देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणात आता पुण्यातील (Pune) डेक्कन पोलीस ठाण्यात देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली या ठिकाणच्या हॉटेलमध्ये प्रकार घडला असल्याने पुण्यात (Pune Police) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Shrikant Deshmukh News Update
सोलापूरच्या श्रीकांत देशमुखांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; भाजप जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर तो सोलापूर पोलिसांकडे (Solapur Police) वर्ग करण्यात आला आहे. पीडित महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. लग्नाचे आमिष दाखवून ही फसवणूक केली, असे महिलेचे म्हणणे आहे.

देशमुख आणि पीडित महिलेचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

श्रीकांत देशमुख यांचा महिलेसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत महिलेसोबत खोलीत देशमुखही होते. देशमुख यांनी लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली, असा आरोप तिने केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला होता. (Solapur Shrikant Deshmukh News In Marathi)

या व्हिडिओच्या माध्यमातून महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसरीकडे श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित महिलेने मेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. घराबाहेर पडायला भीती वाटत आहे, म्हणून मी मेलद्वारे तक्रार करत आहे, असे तिने मेलमध्ये म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com