

Pune Crime News: पुणे शहराच्या उपनगरातील आव्हाळवाडी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी संदिप मोरे पत्नी दिपाली मोरे आणि मुलीसह माळवाडी आव्हाळवाडी (Malwadi Awhalwadi) परिसरात राहतो. आरोपीस दारुचे व्यसन आहे. त्यामुळे पती- पत्नीत नेहमी वाद होत होते.
गुरूवार (३१, ऑगस्ट) रात्री आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यावरून पती- पत्नीत वाद झाला. याच वादातून आरोपीने पत्नीला लाकडी बांबूने मारहाण करून भिंतीवर डोके तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने दिपाली मोरे यांचा मृत्यू झाला. (Crime Story)
पिडित मुलीने आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संदिप मोरे या आरोपीवर लैंगिक अत्याचार (पोस्को) व खून केल्याप्रकरणी लोणीकंद (Lonikand) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.