

पुण्यात गुन्हेगारी वाढली
पुण्यात कुख्यात गुंड राणा कांबळेची कोयत्याने वार करून हत्या
हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती
पुण्यात गुन्हेगारीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. पुण्यातील गंगानगर परिसरात तडीपार गुंडाचा कोयत्याने हल्ला करत खून झाल्याचे समोर आलं आहे. भर रस्त्यात तडीपार गुंडाची हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुंडाच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
पुण्यात पुन्हा गुंडांचा हैदोस पाहायला मिळत आहे. गुंड भर रस्त्यात एकमेकांवर हल्ले करू लागल्याचे समोर येत आहे. गुंडगिरीतील वर्चस्व वादातून राणा कांबळे नावाच्या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. राणा कांबळे हा गेल्या अनेक महिन्यांपासून तडीपार होता. त्याची पुण्यातील गंगानगर परिसरात दहशत होती. कांबळेच्या विरोधात गंभीर गुन्ह्यासह चोरी आणि मारामारीचे गुन्हे दाखल होते. राणा कांबळेच्या हत्येने गंगानगरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गंगानगरमध्ये ओम मोरे आणि राणा कांबळे याच्यात वाद झाला होता. या वादानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदाराने राणा कांबळेला रस्त्यात गाठलं. ओम मोरे आणि त्याच्या साथादाराजवळ कोयते होते. त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदाराने राणा कांबळेवर हल्ला केला. तिघांनी केलेल्या राणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात राणा रस्त्यावरच कोसळला. तिघांच्या जीवघेणा हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला.
दहा दिवसांत तीन हत्या
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यात आठवड्याभरात दोघांच्या हत्या झाल्याची घटना घडली होती. मावळनंतर आता पुण्याच्या गंगानगरमध्ये हत्येची घटना घडली. पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या हत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.