Pune Crime: प्रेमसंबंधात अडथळा ठरला विजय ढुमे; प्रेयसीनं नव्या प्रियकराच्या मदतीने काढला काटा, २४ तासांत धक्कादायक उलगडा

Pune crime: क्वालिटी इन लॉजच्या परिसरात ४४ वर्षीय विजय ढुमेचा खून करण्यात आला होता.
Pune Crime
Pune Crimesaam Tv
Published On

Vijay dhume Case :

शनिवारी रात्री सिंहगड रस्त्यावर झालेल्या विजय ढुमे खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. क्वालिटी इन लॉजच्या परिसरात ४४ वर्षीय विजय ढुमेचा खून करण्यात आला होता. सिंहगड पोलिसांनी या हत्येप्रकरणी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्याच्याच प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने विजय ढुमेचा खून करण्यात आला. (Latest News)

सुजाता समीर ढमाल (रा. किरकटवाडी), संदीप दशरथ तुपे (वय २३, रा. राहू, इंदापूर), सागर संजय तुपसुंदर (वय १९ रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (२८, उंड्री पिसोळी) आणि त्यांच्या अजून एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याच्या तपासासाठी सिंहगड पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपसाले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांना पकडलं.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. तसेच ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाताची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तिच्या चौकशी केली असता तिनेच नवीन प्रियकर संदीप दशरथ तुपे याच्यासोबत ढुमेच्या हत्येचा कट रचल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना ताब्यात घेतलं. दरम्यान संदीप तुपे याच्यावर टेंभुर्णी, इंदापूर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहायक पोलीस फौजदार आबा उतेकर, सतीश नागूल, सुनील चिखले, हवालदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कांडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर आणि दक्ष पाटील यांच्या पथकाने आरोपींना पकडलं. सोमवारी म्हणजेच उद्या या आरोपींना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ढुमेचे पोलीस दलात तसेच शहरातील अनेक गुन्हेगारांशी जवळीक होती. गेल्या १३ वर्षापासून ढुमेचे सुजाताबरोबर प्रेमसंबंध होते. तिचे लग्न झाले आहे. सुजाताला बाउन्सरची नोकरी करायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. चार महिन्यापूर्वी तिचे तुपेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ढुमेचा वारंवार होत असलेला त्रास आणि नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे सुजाताने नवीन प्रियकर तुपेसोबत ढुमेच्या खुनाचा कट रचला.

Pune Crime
Pune Crime News: पुण्यात कोयत्या गँगचा हैदोस सुरुच; टोळक्याने केली पोलिसाच्या मुलाची हत्या, परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com