Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

Pune Crime News : मुलाच्‍या हव्‍यासापोटी जुळ्या मुलींना झोपेत दुध पाजून मारले; अखेर हडपसर पोलिसात खूनाचा गुन्‍हा दाखल

मुलाच्‍या हव्‍यासापोटी जुळ्या मुलींना झोपेत दुध पाजून मारले; अखेर हडपसर पोलिसात खूनाचा गुन्‍हा दाखल
Published on

पुणे : मुलाच्या हव्यासापोटी जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून त्यांना मारुन टाकल्याचा (Pune) धक्कादायक प्रकार पुण्यात घडला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी (Police) खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्‍हा न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Pune Crime News
Nanded Accident News : देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या गाडीला अपघात; ३ महिला गंभीर जखमी

पुण्यात हा धक्‍कादायक प्रकार डिसेंबर २०१८ ते २६ नोव्हेबर २०१९ व ६ फेब्रुवारी २०२० रोजी घडला. जुळ्या मुलींचे वडिल अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी (वय ५५), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी (वय २६, सर्व रा. शिवकृपा हरपळे वस्ती, फुरसुंगी) अशी आरोपींची (Crime News) नावे आहेत. फिर्यादीची बहिण उर्मिला अतूल सूर्यवंशी यांना मुलगाच हवा, या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास देऊन मुले गोरे होण्याकरीता त्यांना वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या.

Pune Crime News
Akola Rain Update : मूर्तिजापुर तालुक्यातील गावे पाण्याखाली; काही गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांना करण्यात आले रेस्क्यू

झोपेतच पाजले बाहेरचे दूध

बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या. उर्मिला हिने २६ नोव्हेबर २०१९ रोजी मुलींना दुध पाजून झोपवले असतानाही त्यांच्या पतीने त्या मुली झोपेत असताना सिद्धी (वय ७ महिने) हिला बाहेरील दुध पाजले. त्यामुळे तिचा मृत्यु झाला. अशाच प्रकारे ६ फेबुवारी २०२० रोजी दुसरी मुलगी रिद्धी (वय ९ महिने) हि झोपली होती. त्यामुळे त्यांच्या सासूने उर्मिला हिला स्वयंपाक घरात जाणिवपूर्वक कामाला लावले. या दरम्‍यान अतुल सूर्यवंशी याने झोपलेले मुलीला बाहेरील दुध पाजून तिलाही जीवे ठार मारले.

Pune Crime News
Sambhajinagar Adarsh Scam : आदर्श घोटाळा प्रकरण..ठेवीदारांचे ३५६ कोटी अडकले; ६२ हजार ठेवीदारांचा जीव टांगणीला

अखेर न्‍यायालयात धाव

मुली झोपेत असल्याने पाजलेले दुध श्वासनलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु झाला. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com