Akola Rain Update : मूर्तिजापुर तालुक्यातील गावे पाण्याखाली; काही गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांना करण्यात आले रेस्क्यू

मूर्तिजापुर तालुक्यातील गावे पाण्याखाली; काही गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांना करण्यात आले रेस्क्यू
Akola Rain Update
Akola Rain UpdateSaam tv
Published On

हर्षदा सोनोने

अकोला : अकोला जिल्ह्यात मंगळवारी रात्री पडलेल्या पावसाचा सर्वात जास्त फटका मूर्तिजापुर तालुक्याला बसला आहे. रात्रीच्‍या (Rain) पावसामुळे काही गावे पाण्याखाली आली असून गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. शिवाय शेतात (Akola) देखील पाणी साचले आहे. यामुळे शेतकरी पाण्यात अडकले होते. (Live Marathi News)

Akola Rain Update
Nanded Accident News : देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या गाडीला अपघात; ३ महिला गंभीर जखमी

अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातील खरब ढोरे गावात नाल्याच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. तर मंगळवारी रात्रीपासून अकोला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहतांना पहायला मिळत आहे. तर गावातील काही घरांची पडझड झाली. मात्र यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून मदत कार्यसाठी (Murtijapur) जिल्हा प्रशासन आणि संत गाडगेबाबा बचाव पथक गावात दाखल झाले आहे.

Akola Rain Update
Sambhajinagar Adarsh Scam : आदर्श घोटाळा प्रकरण..ठेवीदारांचे ३५६ कोटी अडकले; ६२ हजार ठेवीदारांचा जीव टांगणीला

शेतात पाणी साचल्याने अडकले शेतकरी

रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर अनेक शेतात पाणी साचल्याने शेतकरी अडकले होते. तया शेतकऱ्यांना वाचविण्यात यश आले आहे. मूर्तिजापुर तालुक्यातल्या गोरेगाव या गावाचा संपर्क तुटला तर येथील शेकडो हेक्टर जमिनही पाण्याखाली गेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com