Pune Crime News: पुणे पोलिसांचा दणका! जिथे तोडफोड करुन माजवली दहशत; त्याच भागात आरोपींची काढली वरात

चतु:श्रृंगी परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेने ३ महिन्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Pune Crime News:
Pune Crime News:Saamtv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. या गुन्हेगारांविरोधात आता पोलिसांनीही कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. चतु:श्रृंगी परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेने ३ महिन्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर या गुन्हेगारांची त्याच भागातून वरात काढण्यात आली. (Crime News In Marathi)

Pune Crime News:
Uddhav Thackeray News: दुसऱ्यांच्या आजारावर, कुटूंबावर बोलता; ही कोणती संस्कृती? ठाकरेंचा भाजपवर पलटवार

याबाबत अधिक माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील चतुश्रृंगी परिसरात काही गुंडांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली होती. ज्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्यात आल्यानंतर ते तीन महिन्यांपासून फरार होते.

गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने या आरोपींच्या कर्नाटक (Karnataka) राज्यातून मुसक्या आवळल्या. अजय चंद्रकांत विटकर (वय २२), ऋषिकेश उर्फ बबल्या सुनिल देवकुळे (वय १९) व अनिकेत उर्फ डॅनी शंकर मंगळवेढेकर (वय २२, रा. तिघेही रा. गोखलेनगर, वडारवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

Pune Crime News:
Uddhav Thackeray on BJP : ही लोकं कलंकच आहेत, भाजपकडून सुरु असलेल्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

पोलिसांनी काढली धिंड...

या त्यांच्यावर चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर ज्या परिसरात या गुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईची सध्या परिसरात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com