Pune Crime News: पुण्यात कोट्यवधींचं अमली पदार्थ जप्त, एआर रहमानच्या कार्यक्रमाआधी पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime News: पोलिसांनी तिघांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News:  पुणे पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी २ कोटी २१ लाख ६० हजार किमतीचे 1 किलो 100 ग्रॅम अमली पदार्थ (MD) जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरात ही कारवाई केली आहे. आझाद शेरजमन खान, नागेश्वर रामेश्वर प्रजापती अशी अटक केलेल्या तीन पैकी दोन आरोपींची नावं आहेत. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे हे अमली पदार्थ आढळले. आरोपींनी मध्यप्रदेशमधून ट्रॅव्हल्सने पुण्यात हे अमली पदार्थ आणले होते. (Crime News)

Pune Crime News
Mumbai-Pune Express Way Traffic Jam: मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल; VIDEO व्हायरल

ए.आर.रहमानच्या कॉन्सर्टआधी मोठी कारवाई

पुण्यात आज संगीतकार ए.आर.रहमान यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी पोलिसांनी ही ड्रग्स जप्तीची कारवाई केली आहे. आरोपींनी एआर रहमानच्या कार्यक्रमाच्या पार्श्वूभूमीवर काही नियोजन केलं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. (Latest Marathi News)

Pune Crime News
Sambhaji Raje: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार, छत्रपती संभाजीराजेची मोठी घोषणा

पोलिसांना माहिती मिळाली होती की, मध्य प्रदेशातून काही व्यक्ती पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी खराडी येथे सापळा रचून चेकिंग सुरु केली. दरम्यान दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबवलं आणि त्यांची अंगझडती घेतली.

त्यावेळी दोघांकडे त्यांच्याकडे दोन कोटी 21 लाख 60 हजार रुपये किंमतीचे व एक किलो 108 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 31 हजार रुपयांचे 4 मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज जप्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com