Sambhaji Raje: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार, छत्रपती संभाजीराजेची मोठी घोषणा

2024 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार, छत्रपती संभाजीराजेची मोठी घोषणा
Sambhaji Raje
Sambhaji RajeSaam Tv

Sambhaji Raje on Maharashtra Assembly Election 2024 : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळीसह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची मोठी घोषणा, छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. बीडच्या परळी शहरात आयोजित जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

बीडच्या परळीमध्ये खाजगी सावकारीमुळे प्रत्येक वर्षात 15 ते 20 लोकांचे बळी जातात, तसेच परळी शहरांमध्ये दहशत आहे. उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी ठीक आहे. मात्र महाराष्ट्राच्या परळीत एवढी दहशत कशी? असा प्रश्न देखील छत्रपती संभाजी राजांनी उपस्थित केला. तसेच परळी मधील दहशत संपवायचे असेल आणि विकास करायचा असेल तर स्वराज्य पक्षात या, असं आवाहन देखील छत्रपती संभाजी राजे यांनी केलं.

Sambhaji Raje
Karnataka Opinion Poll 2023: कर्नाटकात बहुमताची शक्यता असतानाही काँग्रेसमध्ये तणाव, भाजपसाठी आनंदाची बातमी

यावेळी सभेला संबोधित करताना ते म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आणि स्वराज्यात कुठेही दहशत नव्हती. दहशत ऐकून मला देखील धक्का बसला, पण ती कमी नाही झाली. सावकारकी कमी नाही झाली. तर मी या ठिकाणी येईल.'' (Latest Marathi News)

संभाजीराजे म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या बाबतीतली धोरण देखील बदलली पाहिजेत. दुष्काळ ओला दुष्काळ गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती संदर्भात शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टी कोणातून निर्णय घेणे गरजेचे आहे.''

Sambhaji Raje
Nanded AMPC Election Result: अशोक चव्हाण यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम; भाजपचा सुफडा साफ

मराठा आरक्षणावर (maratha reservation) बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, असं जाहीर केलेला आहे. त्यानंतर राज्य सरकारने क्यूरेटिव पिटीशनदाखल करतो म्हणाले आहेत. माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे, जोपर्यंत मराठा समाज सामाजिक मागास सिद्ध होत नाही . तोपर्यंत आरक्षणाचा कसलाही विचार करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे. फॉरवर्ड क्लास आहे. म्हणून मराठा आरक्षण रद्द केलं आहे. परत पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागेल. सामाजिक मार्ग असे सिद्ध करावे लागेल मगच पुढचा निर्णय होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com