Vasant More News : 'खंडणी द्या, अन्यथा...'; मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे.
Vasant More News
Vasant More News saam tv

Pune News : पुण्यातून मोठं वृत्त समोर आलं आहे. मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर धमकी देऊन तीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. २१ वर्षीय रुपेश मोरे यांना धमकी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी भारती पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी भारती पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. '३० लाख दे, नाहीतर मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करेल', अशी धमकी वसंत मोरे यांच्या मुलाला मिळाली आहे.

Vasant More News
Crime News : रेल्वे स्टेशनवर आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा अखेर गजाआड

वसंत रुपेश मोरे यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर त्यांच्या मुलासाठी धमकीचा मेसेज आला आहे. 'अल्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाले आहे' असे ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवले आहे.

'आम्ही बनावट लग्नाचं प्रमाणपत्र तयार केलं आहे. खराडी आयटी पार्कच्या समोरील वाहनात वीस लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही तुमच्या अत्याचारासाठी गुन्हा दाखल करू' असा धमकीचा मेसेज आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला. 'मी अल्फिया शेख असून ३० लाख रुपये नाही दिल्यास अत्याचाराची तक्रार करून तुरुंगात पाठवेन. अशा पद्धतीचा मेजेस पाठण्यात आला आहे.

Vasant More News
Crime News: पीएमपी बसमध्ये चोरी, महिलेच्या पर्समधून १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले

वसंत मोरे यांना पुन्हा काही दिवसानंतर 'खंडणी द्या, अन्यथा गोळ्या घालू. तुला जीवे मारण्याचा बंदोबस्त केला आहे, लवकरच गोळीबार करून जीवे मारू, तुला वाचवण्यासाठी तुझ्या वडिलांना सांग, असा धमकीचा मेसेज करून तीस लाख रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान, वसंत मोरे यांच्या मुलाला याआधी देखील धमकी देण्यात आली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com