Pune News: तुमचं नाव मनी लॉन्ड्रिंगमध्ये..., पोलिस कारवाईची भीती दाखवत तरुणाला घातला २९ लाखांचा गंडा

Pune Crime News : वाघोली येथे राहणारा ३३ वर्षीय तरुणाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. या तरूणाने याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरटयांनी फोन केला होता.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv

सचिन जाधव, पुणे

पुण्यात मनी लॉन्डरिंग प्रकरणामध्ये (money laundering case) नाव असल्याचे सांगत पोलिस कारवाईची भीती दाखवत सायबर चोरट्याने एका तरुणाची फसवणूक केली आहे. या तरुणाची तब्बल २९.४९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

पुण्यातल्या वाघोली येथे राहणारा ३३ वर्षीय तरुणाची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. या तरूणाने याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरटयांनी फोन केला होता. तुमचे नाव मनी लाँड्रिंगमध्ये असल्याने पार्सल कस्टम विभागाकडे अडकले आहे. तसेच तुमच्या पार्सलमध्ये अवैध अमली पदार्थ सापडले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड आणि बँक अकाऊंटचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे असे सांगून एक लिंक पाठविली.

Pune Crime News
Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

त्यांनतर पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे तरुणाला आरोपींनी सांगितले. तसेच आरोपींनी या तरुणाला अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक अकाऊंटची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत आरोपींनी तरुणाला २९ लाख ४९ हजार रुपये एका अकाऊंटवर ट्रान्सफर करायला सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे तरुणाने देखील हे पैसे ट्रान्सफर केले. पण आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Pune Crime News
Pune News: पहिल्याच पावसात ड्रेनेज तुंबले! रस्त्यांवर पाणीच पाणी, पुणेकरांचे हाल; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

दरम्यान, यापूर्वी पुण्यामध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली होती. या महिलेला तब्बल १९ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या महिलेला परदेशामध्ये पाठवण्यात आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळून आल्याचे सांगत चोरट्यांनी फसवणूक केली होती. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

Pune Crime News
Pune Politics: पुण्यात CM एकनाथ शिंदेंना धक्का! युवासेनेत मोठी फूट; अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com