Pune Police News: 'करिअर बरबाद करू', पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

Man arrested for threatening political leaders: 'करिअर बरबाद करू', पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

>> अक्षय बडवे

Pune Latest News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक पक्षातील राजकीय मंडळींना तसेच व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना धमक्यांचे फोन आले होते. इतकचं काय तर पुण्यातील राजकीय नेत्यांना खंडणीच्या धमक्या देखील आल्या होत्या.

पोलिसांनी याचा तपास केला असता हे सगळं काम पुण्यातील एका व्यक्तीने केलं होतं. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे शहरातील प्रतिष्ठित व राजकीय लोकांना व्हॉट्सॲप कॉल येतो आणि खंडणी मागितली जाते. एका महिन्यात पुण्यातील ४ राजकीय नेत्यांना असे कॉल आले आणि यावरच न थांबता पॉलिटिकल करिअर बरबाद करू, अशा धमक्या देखील मिळाल्या. (Latest Marathi News)

भाजप आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यासह मनसे नेते वसंत मोरे यांना सगळ्यांना गेल्या १ महिन्यात खंडणीचे फोन आले.

Pune News
Ajit Pawar Latest News : 'देवगिरी'त भेटीगाठींचा सिलसिला सुरु; भुजबळ, वळसे पाटील, तटकरेंनी घेतली अजित पवारांची भेट

राजकीय मंडळींनी आणि व्यावसायिक यांना आलेल्या धमक्या

- महेश लांडगे: ३० लाख रुपयांची खंडणी

- अविनाश बागवे: ३० लाख रुपयांची खंडणी

- वसंत मोरे यांचा सुपुत्र रुपेश मोरेला जीव मारण्याची धमकी

- व्यावसायिक अनुज गोयल: ३० लाख रुपयांची खंडणी

- दीपक मिसाळ

पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत या हाय प्रोफाईल केसेस संदर्भात एक ऑपरेशन राबवलं आणि या प्रकरणी २ जणांना पोलिसांनी पुण्यातूनच अटक केलीय. यातील मुख्य आरोपींची नावे नाव इम्रान शेख आणि त्याचा साथीदार शाहनवाज खान, असं आहे. यातील इम्रानने याआधी मनसेचे नेते वसंत मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी जेलची हवा खाऊन आला आहे.

Pune News
Sanjay Raut on Ajit Pawar: 'शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली केली', संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान शेख हा पुण्यातच राहत असून तो विवाह नोंदणी केंद्र चालवत होता. या ठिकाणी त्याच्याकडे एका मुलीचे प्रोफाईल लग्नाच्या नोंदणीसाठी आले होते. मात्र इम्रान स्वतःच या मुलीच्या प्रेमात पडला. मात्र मुलीने स्पष्ट नकार देत इम्रानचा अपमान केला.

मुलीने नकार दिला याचा राग मनात ठेऊन इम्रानने तिची बदनामी करायला सुरुवात केली. त्याने तिचे फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर अपलोड केले. पोलीस मुलीवर कारवाई करतील असा तर्क त्याने लावला, मात्र असं काहीच झालं नाही.

यानंतर इम्रानने राजकीय लोकांना फोन करून खंडणी मागायला सुरुवात केली. विशेष म्हणजे फोनवर धमकी देताना त्या मुलीच्या गाडीत पैसे ठेवा असे तोऱ्यात सांगायचं याचा उद्देश म्हणजे फक्त आणि फक्त त्या मुलीची बदनामी होईल एवढाच होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com