Dowry Harassment: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'ची आत्महत्या; हुंडाबळीचा फास कधी सुटणार?

Dowry Harassment Case: वैष्णवी हगवणेला न्याय मिळण्याआधीच पुण्यात आणखी एका विवाहितेचा हुंड्यापायी बळी गेलाय. दिप्ती चौधरीनं स्वतःला का संपवलं ? दिप्तीच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर काय आरोप केले आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Dowry Harassment Case
, Pune witnesses another dowry-related suicide of a married womansaam tv
Published On
Summary

पैशांसाठी दीप्तीचा छळ

दीप्तीने 24 जानेवारीला तीन वर्षांच्या लेकीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली.

गर्भलिंग चाचणी करुन दुसरीही मुलगी असल्यानं गर्भपात

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची भळभळती जखम भरण्याआधीच पुन्हा एकदा पुण्यातच आणखी एका वैष्णवीनं आत्महत्या केलीय. इंजिनिअर असणाऱ्या दीप्ती मगर-चौधरी या विवाहितेनं हुंड्याच्या जाचामुळे स्वत: च आयुष्य संपवलंय.

Dowry Harassment Case
वंशाच्या दिव्यासाठी गर्भवती महिलेचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं

मोठ्या अपेक्षेने आणि मुलगी सुखी राहिल या आशेने दीप्तीच्या आई-वडिलांनी उरळीकांचन इथं सुशिक्षित कुटुंबात तिचं लग्न लावुन दिलं. मात्र त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय. मगर कुटुंबाने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत. पैशांसाठी दीप्तीचा छळ केला आणि वंशांच्या दिव्यासाठी मुलीचा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती त्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलीय. दीप्तीने 24 जानेवारीला तीन वर्षांच्या लेकीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यासोबत नेमकं काय घडलं? पाहूयात.

Dowry Harassment Case
Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

कोट्यवधींचा हुंडा तरीही भूक भागेना

2019मध्ये दीप्ती आणि रोहनचं लग्न, तिसऱ्याच दिवशी पतीनं दीप्तीवर संशय घेतला

दीप्तीच्या माहेरच्यांनी लग्नात 50 तोळे सोनं, पाच किलो चांदी ,रोहनला व्यवसायासाठी 10 लाख तर कारसाठी 25 लाख दिले

दीप्ती चौधरीची सासू सरपंच तर सासरे मुख्याध्यापक

ऑक्टोबर 2025मध्ये ग्राम पंचायत निवडणुकीवेळी माहेरहून पैसे आणण्यास सांगितलं मात्र दीप्तीचा नकार

गर्भलिंग चाचणी करुन दुसरीही मुलगी असल्यानं गर्भपात

दरम्यान दीप्तीच्या आत्महत्येची महिला आयोगानं दखल घेतलीय.. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दीप्तीच्या आई-वडिलांची भेट घेतली. मात्र मगर कुटुंबानं चाकणकरांना चांगलचं फैलावर घेतलय. दरम्यान दीप्तीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे.

राज्यात हुंडाविरोधी कायदा असताना आधी हगवणे आणि आता मगर कुटुंबावर ओढावलेली ही वेळ दुर्देवीच म्हणावी लागेल. गंभीर बाब म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातही पैशांची हाव कमी होत नाही. सुनेच्या माहेरकडच्या पैशांवर डोळा असणा-यांची खोटी प्रतिष्ठा आहे. त्याशिवाय वंशांच्या दिव्यासाठी ज्योत विझवणारी ही पुरुषी मानसिकता समाजातून कधी नाहीशी होणार ? हा एक मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com