थट्टामस्करीत एका तरुणाने आपल्या मित्राच्या पोटात कॉम्प्रेसरने हवा भरली. या घटनेत अल्पवयीन मुलाचा जागीच जीव गेला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पुणे शहरातील हडपसर परिसरात सोमवारी दुपारसच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. मोतीलाल साहू (वय १६ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शंकरदिन रामदिन साहू यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धीरजसिंग (वय २१ वर्ष) आणि मृत अल्पवयीन मुलगा पुण्यातील एका फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये काम करतात. आरोपी आणि अल्पवयीन मुलामध्ये चांगली मैत्री होती. दोघेही नेहमी एकमेकांची थट्टामस्करी करीत होते.
सोमवारी धीरजसिंग आणि मोतीलाल दोघेही कामावर असताना दुपारी दोघांनी एकमेकांची थट्टामस्करी केली. यावेळी आरोपी धीरजसिंग याने मोतीलाल याच्या तोंडात हवा भरली. या अघोरी प्रकारामुळे मोतीलाल याच्या पोटत जखम झाली.
या घटनेत मोतीलाल याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मोतीलाल याचा मृतदेह ताब्यात घेतला.
याप्रकरणी मोतीलाल याचे मामा शंकरदिन रामदिन साहू यांच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी आरोपी धीरजसिंग याला अटक केली. थट्टामस्करीत मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.