Pune Crime: चालताना धक्का लागल्याने वाद, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर शस्त्राने वार; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Latest News: शहरातील आंबेगाव पठार येथील सिंहगड महाविद्यालयाच्या (Singhgad College) कॅम्पसजवळ ही घटना घडली.
Pune News
Pune NewsSaam Tv

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: दहीहंडी बघून घरी जाताना धक्का लागल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune) घडला. शहरातील आंबेगाव पठार येथील सिंहगड महाविद्यालयाच्या (Singhgad College) कॅम्पसजवळ ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झाला आहे. (Crime News In Marathi)

Pune News
Maharashtra Politics: शिवसेना १६ आमदार अपात्रतेसंदर्भातील कार्यवाहीला वेग; विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ध्रुव विश्वास लंकेश्वर (वय १९, रा. धनकवडी) हा तरुण मित्र सुजलसमवेत दहीहंडी बघून घरी निघाला होता. त्यावेळी सुजलचा एका तरुणाला धक्का लागला. याच रागातून तरुणाने सुजलवर हल्ला चढवला.

हे भांडण सोडविण्यास गेलेल्या ध्रुववरही आरोपीने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रवीण लोंढे या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Pune News
Gondia Fraud: फेसबुकवर मैत्री जमली.. परदेशातून 'बर्थडे गिफ्ट' पाठवण्याचे आमिष अन् गोंदियातील शिक्षिकेला १२ लाखाचा गंडा

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एमपीएससी स्पर्धा (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. क्षुल्लक कारणावरुन प्राणघातक हल्ले तसेच मारामाऱ्या होत असल्याने पुणे शहरात नेमकं चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com