Pune Crime News: पुणे मेट्रोचे साहित्य चोरीला! तीन महिलांसह ५ जणांना अटक; विक्री करण्याच्या तयारीत असताना घेतले ताब्यात

Pune Latest News: चोरलेले साहित्य विक्रीसाठी आणल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश असून चोरीचे साहित्य विक्री करण्याच्या तयारीत असताना चतु:शृंगी पोलिसांनी (ChatuShrungi Police) ही कारवाई केली आहे. आरोपींकडून चोरी केलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Crime News In Marathi)

Pune Crime News
Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News : 'गणेश' च्या निवडणुकीत कोल्हेंच्या भूमिकेमुळे विखेंची अडचण वाढली; थाेरात गटात चैतन्य

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) बाणेर, बालेवाडी परिसरातील सध्या मेट्रो खांबासाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या चोरट्यांनी पळवल्या होत्या. अनिल सुजान काळे आणि दीपक मारूती काळे अशी या आरोपींची नावे आहेत.

हे चोरलेले साहित्य अनिल आणि दीपक हे औंधमधील (Aundh) ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातील भंगार लोखंडी पट्ट्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक करण्यात आली. (Latest Crime News)

Pune Crime News
Dhule News: दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पाडला बंद; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

तर दुसरीकडे मेट्रो साहित्याची चोरी केल्याप्रकरणी (Pune Metro) पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषीजी चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणावरुन सळई, नट असे साहित्य चोरले होते. पोलिसांनी संबंधित महिलांना अटक केली असून चोरीचा माल कोणाला विकला याबाबत आता अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.