Anand Shidha: गणेशोत्सव गोड होणार! शिंदे सरकारकडून मिळणार ५६० कोटींचा आनंदाचा शिधा

State Government Will Distribute Ananda Shidha Of 560 Crores: यंदा गणेशोत्सव काळात राज्य सरकार ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार असल्याची माहिती मिळतेय. यावर आता विरोधकांकडून टीका होत आहे.
आनंदाचा शिधा
Ananda ShidhaSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

राज्यातील नागरिकांसाठी आता एक गोड बातमी आहे. राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाखांहुन अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची माहिती आहे. याबाबत ⁠राज्य सरकारकडुन जीआर / शासनादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. ⁠आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसात पुर्ण करणार आहेत.

गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा

यंदाचा गणेशोत्सव गोड होणार आहे. कारण राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा (Ananda Shidha) निविदा प्रक्रिया आणि ५६० कोटींच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आलीय. ⁠विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडुन मतांच्या पेरणासाठी आनंदाचा शिधा वाटप होत असल्याची टीका विरोधक करत आहे. लोकांना नोकऱ्या द्या, अशी प्रतिक्रिया आनंदाचा शिधा वाटपावर संजय राऊत यांनी (Pune News) दिलीय.

आनंदाच्या शिध्यात काय काय मिळणार?

गौरी गणपती उत्सवानिनित्त प्रत्येकी 1 किलो रवा, (Ananda Shidha In Ganeshotsav) चनाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात हा शिधावाटप करण्यात येणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रूपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया ८ दिवसांत पुर्ण केली जाणार आहे.

आनंदाचा शिधा
Anandacha Shidha : गोरगरिबांना आनंदाचा शिधा पाडव्याला मिळणार की नाही? समोर आली महत्वाची माहिती

गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधावाटप

लोकसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद राहिले होते. त्यानंतर आता गणेशोत्सव काळात हा आनंदाचा शिधावाटप केला जाणार आहे. परंतु आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, याकाळात शिधावाटप केलं जात असल्यामुळे सरकारवर (Eknath Shinde Devendra Fadnavis) विरोधकांचं टीकास्त्र पाहायला मिळतंय. मतांच्या पेरणासाठी आनंदाचा शिधावाटप केलं जाणार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

आनंदाचा शिधा
Anand Shidha: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर; गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त मिळणार 'आनंदाचा शिधा'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com