Pune Breaking News: पुणे विमानतळावर गोंधळ! विमान वेळेत न आल्याने संतप्त प्रवाशांनी केलं आंदोलन

Pune Airport News: पुणे विमानतळावर गोंधळ! विमान वेळेत न आल्याने संतप्त प्रवाशांनी केलं आंदोलन
Pune Airport News
Pune Airport NewsSaam Tv
Published On

Pune Airport News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एअर एशियाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पुणे विमानतळावर सकाळी ५.३५ नियोजित असलेलं विमान वेळेत न आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Pune Airport News
Odisha train tragedy: ओडिशा रेस्क्यू ऑपरेशननंतर NDRF जवानांना मानसिक धक्का; पाण्याच्या जागी दिसतंय रक्त, अन्नावरची भावना उडाली

यानंतर काही प्रवाशांनी एअर एशियाविरुद्ध विमानतळावरच आंदोलन देखील सुरू केले. (Airasia Flight ) सकाळी पाच वाजता नियोजित असलेलं विमान दुपारी साडेतीन वाजले तरी आले नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे काही प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ देखील घातल्याचा प्रकार घडाला.१० तास हून सुद्धा १५० प्रवासी विमानतळावर खोळंबले होते.

Pune Airport News
Pune Police Route March: कोल्हापुरच्या घटनेनंतर पुण्यात अलर्ट! अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा "रुट मार्च"

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते बेंगलोर हे एअर एशियाचे विमान सकाळी ५.३५ या निर्धारित वेळेवर निघाले नाही. या विमानाने दुपारी साडेतीन वाजले तरी बेंगलोरहून टेक ऑफ न केल्याने काही प्रवाशांनी पुणे विमानतळावर गोंधळ घातला. या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाला असे एअर एशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com