Pune News : आई...आई...; झोपेतून उठताच आईला आवाज, अन्...; पुण्यात २८ वर्षीय तरुणाची अकाली एक्झिट

Pune Bhor Youth Death : अक्षय हा रविवारी सकाळी नदीत पोहायला गेला होता. थोडा नाश्ता केल्यानंतर अक्षयला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो थोडावेळ झोपला. दुपारी झोपेतून उठताना त्याला अचानक भोवळी आली.
Bhor taluka Nasrapur village 28 year old Akshay Ringe Sudden death
Bhor taluka Nasrapur village 28 year old Akshay Ringe Sudden deathSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात झोपेतून उठला आणि आईला हाक मारताना अचानक भोवळ येऊन एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अक्षय देविदास रिंगे (वय २८) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा मृत्यू हृदयाविकाराने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अक्षय हा रविवारी सकाळी नदीत पोहायला गेला होता. थोडा नाश्ता केल्यानंतर अक्षयला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो थोडावेळ झोपला. दुपारी झोपेतून उठताना त्याला अचानक भोवळी आली. त्यावेळी त्याने आईला हाक मारली आणि तो खाली कोसळला. घरातील व्यक्तींनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. भोरमधील राजगड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षयचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळलेलं नाही. मात्र हृदयाविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकतं.

Bhor taluka Nasrapur village 28 year old Akshay Ringe Sudden death
Mumbai Accident : अनधिकृतपणे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं, मजुराने JCB बाईकवर चढवलं, खाली पडलेल्या तरुणाला चिरडलं; मुंबईत भीषण अपघात

अक्षयचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. खेळाची आवड असलेला आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा हा युवक अचानक काळाच्या पडद्याआड गेल्यानं गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. सुस्वभावी अक्षयचा मित्रवर्गही मोठा होता. त्यांनाही या वृत्तानं धक्का बसला आहे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह मित्र आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावातील होतकरु तरुण गमावल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अक्षयच्या गावातील नागरिकांकडून त्याच्या आठवणींना उजाळा देत हळहळ व्यक्त केली जात आहे. अक्षयच्या मृत्यूमुळे नसरापूर गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Bhor taluka Nasrapur village 28 year old Akshay Ringe Sudden death
वेळेत सुधारा... नाहीतर नकाशावरुन संपवून टाकू, पाकड्यांना निर्वाणीचा इशारा; भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत रणरागिनी काय म्हटल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com